धोनीचा RCB कडून अपमान! चूक लक्षात येताच कोहली पळत CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये गेला अन्..

RCB MS Dhoni No Handshake Scene: अटीतटीच्या सामन्यामध्ये आरसीबीने धोनीच्या संघाला 27 धावांनी पराभूत करत अनपेक्षितरित्या प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर मैदानावरील एका वेगळ्याच गोष्टीमुळे वादाला तोंड फुटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 20, 2024, 12:56 PM IST
धोनीचा RCB कडून अपमान! चूक लक्षात येताच कोहली पळत CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये गेला अन्.. title=
सीएसकेविरुद्धच्या सामन्यानंतर घडला हा सारा प्रकार

RCB MS Dhoni No Handshake Scene: इंडियन प्रिमिअर लीगच्या करो या मरो सामन्यामध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा अनपेक्षितपणे पराभव करत प्लेऑफमधील चौथं स्थान पटकावलं. चेन्नईला 27 धावांनी पराभव केल्यानंतर आनंदाच्या भरात बंगळुरुच्या संघातील खेळाडूंना चेन्नस्वामी स्टेडिमवर महेंद्र सिंह धोनीशी साधं हस्तांदोलन करण्याचं भानही राहिलं नाही. धोनीसहीत चेन्नईचे खेळाडू रांग लावून आरसीबीच्या खेळाडूंचं अभिष्टचिंतन करण्यासाठी उभे होते. मात्र बराच वेळ झाला तरी आरबीसीचा एकही खेळाडू त्यांना भेटायला न आल्याने धोनी तिथून निघून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अगदी क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंपासून अनेक दिग्गजांना आरसीबीचं हे वागणं पटलेलं नाही. मात्र या गोंधळानंतर विराट कोहली आणि आरसीबीच्या अन्य एका खेळाडूने केलेली कृती आता चर्चेत आहे

चूक लक्षात आल्यावर...

मात्र आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर विराट कोहली धोनीच्या पाठोपाठ पळत चेन्नईच्या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला. त्याने धोनीबरोबर चर्चा केली. मात्र विराटबरोबरच अन्य एक आरसीबीचा खेळाडू चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये गेल्याचं समोर आलं आहे. 

धोनी बाद झाला अन् सामना फिरला

शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज असतानाही धोनी बाद झाला. धोनीने 110 मीटर लांब षटकार मारल्यानंतर तो झेलबाद झाला. यश दयालच्या गोलंदाजीवर धोनी झेलबाद झाला. धोनी बाद होऊन परत जाताना सीएसकेचा पराभव अटळ असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरच दिसत होतं. दयालने उरलेल्या चार चेंडूंमध्ये केवळ एक धाव दिली आणि आरसीबीने सामना 27 धावांनी जिंकत चौथं स्थान पटकावलं तर धोनीचा संघ पाचव्या स्थानी राहत बाहेर पडला.

धोनीला केलं इग्नोर

सामना संपल्यानंतर धोनीने आरसीबीच्या खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी मैदानात पाऊल ठेवलं. तो बॉण्ड्रीजवळ आला आणि आरसीबीच्या खेळाडूंची वाट पाहत होता. मात्र आरसीबीचा संघ सेलिब्रेशनमध्ये एवढा व्यस्त होता की त्यांनी धोनीकडे लक्षच दिलं नाही. अखेर धोनीने सपोर्टींग स्टाफबरोबर हस्तांदोलन केलं अन् तो निघून गेला. 

कोहली धोनीला शोधत ड्रेसिंग रुममध्ये

धोनी ड्रेसिंग रुममध्ये निघून गेल्यानंतर कोहली त्याला मैदानात शोधत होता. अखेर तो चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला. तिथे जाऊन तो धोनीला भेटला. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समोर आलं नाही मात्र दोघांची भेट सीएसकेच्या ड्रेसिंग रुममध्ये झाली हे नक्की. मात्र विराटबरोबर केवळ अन्य एक आरसीबीचा खेळाडू चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धोनीला भेटायला गेला. हा खेळाडू म्हणजे वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल! खरं तर गेल संपूर्ण सामन्यादरम्यान मैदानात उपरस्थित होता. गेल सीएसकेचा प्रशिक्षक आणि माजी सहकारी डेव्हेन ब्रॉव्होलाही भेटला. त्यानंतर त्याने धोनीकडून एक जर्सीही साईन करुन घेतली. गेलने स्वत: धोनीच्या भेटीचा फोटो इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केला आहे. "दोन ग्रेट चॅम्पियन्सला भेटलो. धोनी आणि डेव्हेन ब्रावो... फार प्रेम आणि आदर," अशी कॅप्शन गेलने ब्रावो आणि धोनीबरोबरच्या फोटोला दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chris Gayle (@chrisgayle333)

आरसीबीचा एलिमिनेटरमधील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. हा सामना बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे.