कोलकाताच्या क्रिकेटपटूचं मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची कॉपी

आनंद गगनात मावेना, क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची क्रिकेटपटूकडून कॉपी 

Updated: Mar 31, 2022, 04:07 PM IST
कोलकाताच्या क्रिकेटपटूचं मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची कॉपी  title=

मुंबई : जास्त विकेट्स घेतल्यानंतर किंवा कॅच आऊट केल्यानंतर खेळाडू मैदानात त्यांच सेलिब्रेशन करतात. त्याच प्रमाणे आता एका खेळाडूनं मजेशीर सेलिब्रेशन केलं आहे. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल सारखं सेलिब्रेशन होत असल्याचं दिसलं आणि त्या व्हिडीओची तुफान चर्चा झाली.

बंगळुरू टीममधील लेग स्पिनर वागिंदु हसरंगाचं कौतुक होत आहे. त्याने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 4 विकेट्स घेतल्या. त्याने याचं सेलिब्रेशन खूप हटके पद्धतीनं केलं. क्रिकेटच्या मैदानात त्याने केलेल्या हटके सेलिब्रेशनची चर्चा सुरू आहे. त्याचं या सेलिब्रेशनशी फुटबॉल कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. 

हसरंगाला मॅन ऑफ द मॅच अॅवॉर्ड देखील मिळालं आहे. त्याने कोलकाता संघातील 4 विकेट्स घेतल्या आहेत. याचं सेलिब्रेशन त्याने आगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलं. अशा पद्धतीनं सेलिब्रेशन कऱण्यामागचं त्याने कारणही सांगलं आहे. 

हरसंगा म्हणाला की मला नेमार प्लेअर खूप जास्त आवडतो. त्यामुळे मी त्याची सेलिब्रेशनची स्टाईल कॉपी करतो. मी माझ्या बॉलिंगवर खूप खूश आहे. खरंतर माझ्यासाठी तो सर्वात कठीण क्षण होता. पण आता मी खूप जास्त आनंदी आहे. 

कोलकाता टीम पहिल्यांदा मैदानात फलंदाजीसाठी उतरली. त्यांनी 128 धावांचं लक्ष्य ठेवलं. बंगळुरू टीमने कोलकातावर विजय मिळवला आहे. एक छोटी चूक बंगळुरूच्या फायद्याची ठरली आणि दिनेश कार्तिकने संघाला विजय मिळवून दिला.