विराट-अनुष्काच्या रिसेप्शनला सुरुवात

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले.

Updated: Dec 21, 2017, 08:54 PM IST
विराट-अनुष्काच्या रिसेप्शनला सुरुवात  title=

नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधल्या रिसॉर्टमध्ये या दोघांचं लग्न झालं. यानंतर आता आज दिल्लीमध्ये दोघांच्या रिसेप्शनला सुरुवात झाली आहे. रिसेप्शनच्या आधी हे दोघं माध्यमांसमोर आले.

'विरुष्का'च्या रिसेप्शनसाठी ५०० हून अधिक जणांना आमंत्रित करण्यात आलंय... तर २६ डिसेंबर रोजी मुंबईतही एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्स उपस्थित होतील.

मुंबईमधलं रिसेप्शन झाल्यावर विराट कोहली भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होईल. तर जानेवारी महिन्यामध्ये अनुष्का शर्मा नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.