Rishabh Pant आयपीएल 2023 खेळणार का? डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची माहिती!

ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर, चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी!

Updated: Dec 30, 2022, 07:30 PM IST
Rishabh Pant आयपीएल 2023 खेळणार का? डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची माहिती!  title=

Rishabh Pant Health Update : भारताचा स्टार खेळाडू ऋषभ (Rishabh Pant) पंतच्या अपघातामुळे संपूर्ण क्रिकेटविश्व हादरलं आहे. पंतचा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये (Rishabh Pant Car Accident) त्याच्या कारने पेट घेतला आणि कार जाग्यावर जळून खाक झाली. पंतला या अपघातामध्ये जबर दुखापत झालीय. (Rishabh Pant play IPL 2023 The doctor gave important information about the Health) त्यामुळे भविष्यात ऋषभ क्रिकेट खेळणार की नाही? किंवा गंभीर दुखापत असेल तर कधी रिकव्हर होईल या प्रश्नांना ऊत आला आहे. अशातच ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी महत्त्वाची बातमी दिली आहे. (Rishabh Pant play IPL 2023 The doctor gave important information about the health latest marathi sport News)

डॉक्टर सुशिल नागर (Dr. Sushil Nagar) यांनी सांगितलं की, पहिल्या एक्स रेमध्ये कुठेही फ्रॅक्चर असल्याचं दिसून आलं नाही. ऋषभ पंतला कपाळाला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. आणि इतक्या आगीतही त्याला कुठेही भाजलेलं नाही. कपाळाला दोन जखमा झाल्या आहेत. एक डाव्या डोळ्याच्या अगदी वर आहे. गुडघ्याला जखम झाली असून जोरदार धक्का बसल्याने पाठीला दुखापत झाली आहे.

आम्ही ऋषभ पंतच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहोत. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच बरा होऊन परतेल, असं डीडीसीएचे सेक्रेटरी सिद्धार्थ साहिब सिंग (DDCA Secretary Siddharth Sahib Singh) यांनी सांगतिलं आहे. पंतबाबत सकारात्मक माहिती समोर आल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघामध्ये पंतला भविष्यातील एक प्रमुख खेळाडू म्हणून पाहिलं जातं. पंतनेही त्याच्या एकट्याच्या हिमतीवर संघाला सामने जिंकून दिले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पंत दोन किंवा तीन महिन्यात पूर्ण कव्हर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे IPL मध्येही पंत खेळताना दिसू शकतो. 

नेमका कसा आणि कुठे झाला अपघात?
दिल्ली-देहरादूनमधील हायवेवरून घरी जात असताना पहाटेच्या वेळी पंतची गाडी दुभाजकाला धडकून अपघात झाला. पंतची कार स्पीडमध्ये असल्याने दुभाजकाला धडकल्यावर चार ते पाचवेळा कारने पलटी मारली.अपघातानंतर या कारने पेट घेतला. पंतला अपघातात गंभीर जखमी झाला असून दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.