भर सामन्यात सिराजवर संतापला Rohit Sharma; पाहा नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल

आजच्या सामन्यात टीमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र यावेळी मोहम्मद सिराजची फिल्डींग योग्य झाली नाही. यावेळी रोहित शर्मा त्याच्यावर वैतागलेला दिसला. 

Updated: Jan 21, 2023, 07:16 PM IST
भर सामन्यात सिराजवर संतापला Rohit Sharma; पाहा नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल title=

Rohit Sharma on Mohammed Siraj : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये आज सीरिजमधील दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी किवींच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा चांगला खेळ पहायला मिळाला. मात्र असं असताना देखील कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाज मोहम्मद सिराजवर (Mohammed Siraj) संतापलेला दिसला. 

दुसऱ्या सामन्यावेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) चा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये फिल्डींग करताना रोहित शर्मा सिराजवर (Rohit Sharma Angry on Mohammed Siraj) चांगलाच वैतागलेला दिसतोय.

Mohammed Siraj च्या  खराब फिल्डींगमुळे नाराज झाला हिटमॅन

ही घटना न्यूझीलंडच्या डावातील 16 व्या ओव्हरमधील आहे. यावेळी हार्दिक पंड्या गोलंदाजी करत होता. हार्दिकने फिलिप्सला बॉल टाकला आणि त्याने मिडविकेटच्या बाजूला बॉल मारला. 

यावेळी तिथे मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) फिल्डींग करत होता. यावेळी सिराज बॉलला योग्य पद्धतीने अडवू शकला नाही. जिथे एक रन मिळायला हवे होते, तिथे फलंदाजांनी खराब फिल्डींगमुळे धावून 3 रन्स घेतले. सिराजच्या या खराब फिल्डींगनंतर कर्णधार रोहित शर्मा संतापला होता. 

टीम इंडियाने जिंकली सीरिज

न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा वनडे टीम इंडियाने 8 विकेट्सने जिंकला. या सामन्यासह भारताने सीरिज देखील खिशात घातली आहे. या सामन्यात रोहित शर्माची बॅट अखेर तळपली. कर्णधाराने ओपनिंगला उतरत अर्धशतक झळकावलं आणि टीमला विजय मिळवून दिला. अवघ्या 21 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे लक्ष्य गाठलं आहे.

रोहित शर्माची कॅप्टन इनिंग

आजच्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. यावेळी त्याने 50 बॉल्समध्ये रन्सची खेळी केली. यामध्ये कर्णधाराने 7 फोर आणि 2 सिक्सेसचा समावेश आहे. तर शुभमन गिलने 53 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली. रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली देखील मैदानात उतरला होता. मात्र अवघ्या 11 रन्सवर त्याला माघारी परतावं लागलं.

टीम इंडियाची भेदक गोलंदाजी

टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स घेतले. तर हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 2-2 विकेट्स घेतल्या आहे. तर मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1-1 विकेट काढण्यात यश आलं आहे.