रोहितचे दमदार शतक, वनडेमधील १६वे शतक

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दमदार शतक ठोकलेय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 13, 2017, 02:23 PM IST
रोहितचे दमदार शतक, वनडेमधील १६वे शतक title=

मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दमदार शतक ठोकलेय.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळतोय. रोहित शर्माने ११६ चेंडूत शतक ठोकलेय. वनडे कारकिर्दीतील त्याचे हे १६वे शतक आहे. रोहितच्या शतकी खेळीमुळे भारताने अडीचशेहून अधिक धावा केल्यात. 

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा फ्लॉप ठरला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने ही कसर भरुन काढली. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या हाराकिरीमुळे सामना गमवावा लागला होता. या सामन्यात भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते.