सानियाने चाहत्यांना दिले खास सरप्राईज...

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 2, 2018, 07:49 PM IST
सानियाने चाहत्यांना दिले खास सरप्राईज... title=

नवी दिल्ली : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. आता नववर्षाच्या निमित्ताने सानियाने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर एक सरप्राईज दिले आहे.

काय आहे सरप्राईज?

तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती सलमान आणि कतरिनाच्या ‘टायगर जिंदा है’या चित्रपटातील स्वॅग से स्वागत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 दुबईत डान्सचे धडे 

सध्या ती दुबईमध्ये डान्सचे धडे घेत आहे. पहिल्यांदाच आपण अशाप्रकारे डान्स क्लासला प्रवेश घेतला असल्याचे तिने सांगितले. व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिले की, असा असेल डान्सचा व्हिडिओ. तिचा हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. 

व्हिडिओ लक्षवेधी

गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती काही दिवसांपासून टेनिसपासून दूर होती. ती ऑस्ट्रेलिया ओपनमध्येही खेळू शकली नाही. त्यामुळे ब्रेक घेत ती दुबईला रवाना झाली आहे. तिथे तिने डान्स क्लासमध्ये डान्स करतानाचा हा व्हिडिओ लक्षवेधी ठरत आहे.