जडेजाचा धमाका, एका ओव्हरमध्ये लगावले ६ षटकार

भारताचा क्रिकेटर रवींद्र जडेजाने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये जामनग आणि अमरेलीदरम्यान झालेल्या टी-२० सामन्यात जबरदस्त प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 16, 2017, 10:14 AM IST
जडेजाचा धमाका, एका ओव्हरमध्ये लगावले ६ षटकार title=

राजकोट : भारताचा क्रिकेटर रवींद्र जडेजाने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये जामनग आणि अमरेलीदरम्यान झालेल्या टी-२० सामन्यात जबरदस्त प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.

जामनगरकडून खेळणाऱ्या जडेजाने एका षटकांत सहा षटकार ठोकले. इतकंच नव्हे तर ६९ चेंडूत त्याने १५४ धावा तडकावल्या. जडेजाने १०व्या ओव्हरमध्ये खेळण्यास सुरुवात केली. १५व्या षटकांत त्याने ६ चेंडूवर ६ षटकार ठोकले. दमदार प्रदर्शन करताना त्याने १० षटकार आणि १५ चौकारांच्या जोरावर १५४ धावा चोपल्या.

अमरेली संघासमोर विजयासाठी २४० धावांचे आव्हान होते. हे आव्हान अमरेली संघाला पूर्ण करता आले नाही आणि ५ विकेट गमावत ११८ धावांवर त्यांचा डाव आटोपला. जडेजाच्या १५४ धावांच्या जोरावर जामनगर संघाला विजय मिळवता आला.