Harmanpreet Kaur: आता अतीच झालं बरं का! हरमनप्रीतवर बोलतना शाहिद अफ्रिदीने दात दाखवले, म्हणतो...

Shahid Afridi on Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने सामन्या झाल्यानंतर देखील अंपायर आणि बांग्लादेशी खेळाडूंची हुज्जत घातली होती, अशातच आता क्रिडाविश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येतंय. 

Updated: Jul 26, 2023, 07:44 PM IST
Harmanpreet Kaur: आता अतीच झालं बरं का! हरमनप्रीतवर बोलतना शाहिद अफ्रिदीने दात दाखवले, म्हणतो... title=
Shahid Afridi on Harmanpreet Kaur

Harmanpreet Kaur suspended by ICC : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात झालेल्या सामन्यात अंपायर्सच्या निर्णयांवरून मोठा वाद झाल्याचं समोर आलं होतं. टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने भर मैदानात स्टंप्सवर बॅट आदळून नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर तिने सामन्या झाल्यानंतर देखील अंपायर आणि बांग्लादेशी खेळाडूंची हुज्जत घातली होती, अशातच आता क्रिडाविश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद अफ्रिदी (Shahid Afridi) याने हरमनप्रीत कौर प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे.

काय म्हणाला Shahid Afridi?

सध्याचं हे प्रकरण फक्त भारताबाबत नाही. तर अनेक देशांच्या खेळाडूंकडून यापूर्वी घडताना पाहिलं आहे. मात्र, महिला क्रिकेटमध्ये असा प्रकार सहसा पहायला मिळत नाही. परंतु जे काही झालं ते निंदनीय अशा स्वरूपाचं होतं, असं शाहिद अफ्रिदीने म्हटलं आहे. पहायला गेलं तर भारत आणि बांग्लादेश यांच्यातील हा सामना मोठा सामना होता. त्यामुळे या घडलेल्या घटनेवर मोठ्या शिक्षेद्वारे आपण भविष्यासाठी एक आदर्श ठेवू शकता, असं म्हणत शाहिद अफ्रिदीने (Shahid Afridi on Harmanpreet Kaur) फुकटचा सल्ला दिला आहे. 

आणखी वाचा - IND vs IRE: जसप्रीत बुमराह होणार टीम इंडियाचा कॅप्टन? 'या' नव्या छाव्यांना संधी मिळण्याची शक्यता

तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर आक्रमकता दाखवू शकता, पण ती आक्रमकता नियंत्रित स्वरुपाची त्याचबरोबर संघाच्या भल्यासाठी असायला हवी आणि तरच ती चांगली असते. मात्र हे जरा अतीच झालं बरं का... सामन्यात जे झालं त्यामानाने दिलेली शिक्षा ही कमीच आहे, असं मत शाहिद अफ्रिदीने मांडलं आहे.

ICC ची कारवाई

दरम्यान, हरमनप्रीत कौरला आयसीसीच्या (ICC Code of Conduct) आचारसंहितेचे 2 वेगवेगळे उल्लंघन केल्यामुळे पुढील 2 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.  लेव्हल 2 च्या गुन्ह्यासाठी कौरला तिच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि तिच्या शिस्तभंगावर 3 डिमेरिट गुण मिळाले आहेत. त्याचबरोबर संबंधित घटनेच्या संदर्भात सार्वजनिक टीका केल्यामुळे देखील आयसीसीने नापंसती दर्शवली. त्यामुळे संबंधित लेव्हल 1 गुन्ह्यासाठी तिच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड देखील ठोठावण्यात आला आहे.