पॉपस्टार शकिरा आणि टेनिस स्टार राफेल नदाल यांच्यात 'सिक्रेट रिलेशन'!

शकिरा आणि टेनिस स्टार राफेल नदाल यांच्यात सिक्रेट रिलेशनमध्ये होते, अशी चर्चा रंगली आहे. स्पॅनिश पापाराजी जॉर्डी मार्टीन याने जेरार्ड आणि क्लारा यांचे फोटो लीक केल्यानंतर हा धक्कादायक खुलासा केला आहे.

Updated: Aug 30, 2022, 08:19 PM IST
पॉपस्टार शकिरा आणि टेनिस स्टार राफेल नदाल यांच्यात 'सिक्रेट रिलेशन'! title=

Shakira's secret relationship with Tennis star: हॉलिवूड पॉप सिंग शकिराचे जगभरात चाहते आहेत. 'हिप्स डोंट लाय' आणि 'वाका वाका' या गाण्यांमुळे शकिरा प्रसिद्धीच्या झोतात आली. या व्यतिरिक्त शकिरा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी शकिरा आणि Gerard Pique यांचं ब्रेकअप झालं आहे. जेरार्ड याचं एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने नातं संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे. जेरार्ड पिक हा क्लारा चिया हिला डेट करत असल्याची अफवा उडाली आहे. असं असताना शकिरा आणि टेनिस स्टार राफेल नदाल यांच्यात सिक्रेट रिलेशनमध्ये होते, अशी चर्चा रंगली आहे. स्पॅनिश पापाराजी जॉर्डी मार्टीन याने जेरार्ड आणि क्लारा यांचे फोटो लीक केल्यानंतर हा धक्कादायक खुलासा केला आहे. स्पॅनिश फूटबॉलपटूला भेटण्यापूर्वी शकिराचे  स्टार टेनिसपटूशी सिक्रेट संबंध असल्याचं सांगितलं आहे. 

"शकिराने अलेजांद्रो सॅन्झसोबत एक व्हिडीओ क्लिप बनवली होती, परंतु ती त्याच्याशी गुंतली नाही, असं मी म्हणू शकतो" असं मार्टिनने अमेरिकन नोटिसियनला सांगितलं. "पण ती तितक्याच किंवा अधिक प्रसिद्ध व्यक्तीसोबत जवळीक साधली.", असंही त्याने पुढे सांगितलं. यावर शोच्या होस्टने त्या व्यक्तीचं नाव उघड करण्याची विनंती केली. तेव्हा त्याने सांगितलं, "तो एक जगप्रसिद्ध व्यक्ती असून अव्वल खेळाडू आहे. पण फूटबॉलपटू नसून टेनिसपटू आहे"

मार्टिनने टेनिसपटूचे नाव उघड केलं नाही. पण त्याने दिलेल्या सगळ्या संकेतामुळे राफेल नदाल याचं नाव चर्चेत आहे. त्याने हिंट देताना सांगितलं की, 2010 मध्ये शकिराचं गिताना व्हिडीओ समोर आलं होतं.' या व्हिडीओत तिच्यासोबत राफेल नदाल दिसला होता. "मी सांगतो की, तो तीन सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंपैकी स्पेनमधील एका अव्वल ऍथलीटसह व्हिडीओ क्लिपमध्ये काहीतरी होते. मी ते सोडून देतो, मी नाव सांगू शकत नाही,", असंही तो पुढे म्हणाला.