भारत 'अ' संघाने इंग्लंडमध्ये रचला इतिहास

इंग्लंड दौऱ्यावरील दुसऱ्या सराव सामन्यात भारत अ संघाने लीसेस्टरशरविरुद्ध ४ बाद ४५८ इतकी मोठी धावसंख्या उभारलीये. 

Updated: Jun 20, 2018, 10:56 AM IST
भारत 'अ' संघाने इंग्लंडमध्ये रचला इतिहास title=

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावरील दुसऱ्या सराव सामन्यात भारत अ संघाने लीसेस्टरशरविरुद्ध ४ बाद ४५८ इतकी मोठी धावसंख्या उभारलीये. भारत अ संघाची धावसंख्या लिस्ट ए सामन्यांमधील दुसरा सर्वाधिक स्कोर आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारत अ संघाने २२ जूनपासून सुरु होणाऱ्या ट्रायसिरीजआधी लीसेस्टरशरविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्याचत २८१ धावांनी हरवले. भारत अ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद ४५८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल लीसेस्टरशर संघ ४०.४ षटकांत १७७ धावांवर बाद झाला.

युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी दमदार फलंदाजी केली. त्यांनी आयपीएलमधील फॉर्म कायम राखत संघाला साडेचारशेपार नेले. पृथ्वी शॉने ९० चेंडूत आक्रमक खेळी करताना १३२ धावांची खेळी केली. यात त्याने २० चौकार आणि तीन षटकार लगावले. यासोबतच त्याचा सहकारी मयांक अग्रवालने १०६ चेंडूत १५१ धावांची खेळी केली. मयांक बाद झाला नाही. मात्र दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले.

अंडर-19चा स्टार क्रिकेटर शुभमन गिलने हार्ट हिटिंगचा सराव केला. त्याने ५४ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. मात्र या मोठ्या धावसंख्येचा पाया पृथ्वी आणि मयांकने रचला. दोघांनी २६ षटकांत २२१ धावांची खेळी केली. लीसेस्टरशायरच्या संघातील ५ खेळाडूंनी या सामन्याद्वारे पदार्पण केले होते. त्यांचा सलामीवीर गोलंदाज बेन माइकच्या ३ षटकांत भारतीय गोलंदाजांनी तब्बल ४६ धावा ठोकल्या.

रिचर्ड जोन्सने १० षटकांत ६८ धावा केल्या. इंग्लंडमध्ये या सीझनमधील अधिकांश सामने हे अधिक स्कोरिंगचे राहिलेत. दोन्ही संघाकडून ३५०हून अधिक धावा केल्या जातायत. मंगळवारी इंग्लंडच्या टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक स्कोर केला. त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ४९१ धावा केल्या.