Shubman Gill: पहिल्या टी-20 पूर्वी स्टेडियममध्ये 'शर्टलेस' झाला शुभमन; फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा

Shubman Gill in Durban : सिरीज सुरु होण्याच्या अवघ्या 2 दिवस अगोदर शुभमन गिल डरबनला पोहोचला. यावेळी त्याने त्याचा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला असून हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सुरभि जगदीश | Updated: Dec 9, 2023, 10:49 AM IST
Shubman Gill: पहिल्या टी-20 पूर्वी स्टेडियममध्ये 'शर्टलेस' झाला शुभमन; फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा title=

Shubman Gill in Durban : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 दौऱ्यानंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली आहे. 10 तारखेपासून टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सिरीजला सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उरणार असून टीमचा ओपनर शुभमन गिलच्या एका फोटोची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. 

सिरीज सुरु होण्याच्या अवघ्या 2 दिवस अगोदर शुभमन गिल डरबनला पोहोचला. यावेळी त्याने त्याचा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला असून हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शुभमनने 'शर्टलेस' फोटो पोस्ट करून डरबनमध्ये आल्याचे अपडेट दिले आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सिरीजसाठी टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू बुधवारीच डरबनला पोहोचले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी सांगितलं की, स्टार ओपनर शुभमन गिल यूकेला गेला होता. यूकेमधून उड्डाण केल्यानंतर शुक्रवारी तो टीममध्ये सामील झाला. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या वर्ल्डकप फायनलपासून शुभमन गिल सुट्ट्यांवर गेला होता. तो सुट्टीसाठी ब्रिटनला गेला होता. 

यावेळी शुभमनने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो किंग्समीड स्टेडियमवर 'शर्टलेस' उभा आहे. 

fallback

10 डिसेंबरपासून सिरीजला होणार सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सिरीजमधील पहिला T20 सामना 10 डिसेंबर रोजी डर्बनमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 12 डिसेंबर रोजी गेकेबरहामध्ये तर तिसरा टी-20 सामना 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गला होणार आहे. 

यानंतर वनडे सिरीजला सुरुवात होणार असून 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये होणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 19 तारखेला गेबेरहा तर सिरीजमधील शेवटचा सामना 21 डिसेंबर रोजी पार्लमध्ये होणार आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टेस्ट सिरीजला सुरुवात करणार आहे. या सिरीजमधील पहिला टेस्ट सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीही कमबॅक करणार आहे. सिरीजमधील शेवटचा टेस्ट सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.