SL vs BAN : श्रीलंकेकडून बांगलादेशाचा दारूण पराभव; 5 विकेट्सने जिंकला सामना

SL vs BAN, Asia Cup 2023 Cricket 2nd Match Live Scoreboard: पल्लेकेले मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला विजयासाठी 165 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. 66 बॉल्स राखून श्रीलंकेने हा विजय मिळवलाय.

सुरभि जगदीश | Updated: Aug 31, 2023, 10:18 PM IST
SL vs BAN :  श्रीलंकेकडून बांगलादेशाचा दारूण पराभव; 5 विकेट्सने जिंकला सामना title=

SL vs BAN, Asia Cup 2023 Cricket 2nd Match Live Scoreboard: आशिया कपला सुरुवात झाली असून दुसरा सामना श्रीलंका विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यात श्रीलंकेने 5 विकेट्सने बांगलादेशाचा पराभव केला आहे. पल्लेकेले मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला विजयासाठी 165 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. 66 बॉल्स राखून श्रीलंकेने हा विजय मिळवलाय.

श्रीलंकेच्या विजयात सादिरा समरविक्रमा आणि चरिथ असलंका यांनी मोलाची भूमिका बजावली. सदीराने उत्तम अर्धशतक झळकावत 54 रन्स केले. ज्यामध्ये सहा चौकारांचा समावेश होता. तर चरित असलंकाने 92 बॉल्समध्ये 62 रन्सची नाबाद खेळी खेळली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 78 रन्सची पार्टनरशिप केली आणि श्रीलंकेला विजय मिळवून दिला.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या बांगलादेश टीमची सुरुवात चांगली झाली नाही. महिष तेक्षानाने डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये तनजीद हसनला एलबीडब्ल्यू आऊट केले. डेब्यू सामन्यात खेळणाऱ्या तनजीदला एक रनही करता आला नाही. बांगलादेशकडून शांतोने सर्वाधिक म्हणजेच 89 रन्सची खेळी केली.

शंतोशिवाय केवळ मुशफिकूर रहीम, मोहम्मद नईम आणि तौहीद हृदोय यांनाच दुहेरी आकडा गाठण्यात यश आलं. श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने 7.4 ओव्हर्समध्ये चार आणि महिष तिक्ष्णाने दोन विकेट्स घेतले. 

बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन

मोहम्मद नईम, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदयॉय, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन

दिमुथ करुणारत्ने, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरित अस्लंका, धनंजय डिसिल्व्हा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथा वेलेज, महिश तिस्चाना, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना