तर धोनीला पर्याय शोधा, दादाचा सल्ला

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे. सीरिज भारतानं जिंकली असली तरी धोनीच्या टी-20 क्रिकेटमधील स्थानाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Updated: Nov 8, 2017, 09:16 PM IST
तर धोनीला पर्याय शोधा, दादाचा सल्ला  title=

कोलकाता : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे. सीरिज भारतानं जिंकली असली तरी धोनीच्या टी-20 क्रिकेटमधील स्थानाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि अजित आगरकर यांच्यानंतर आता सौरव गांगुलीनंही धोनीला पर्याय शोधण्याचा सल्ला दिला आहे. टी-20मध्ये धोनी चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला पर्याय शोधण्याबाबत विचार करायला हवा, असं गांगुली म्हणाला आहे. धोनीच्या टीममधील भूमिकेबाबत टीम मॅनेजमेंटनं बोलण्याची आता वेळ आली आहे. धोनी टी-20मध्ये आला तेव्हा मोठं नाव होतं. त्यामुळे धोनीला स्वत:ला सिद्ध करण्याची पूर्ण संधी मिळाली पाहिजे, असं गांगुली एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणलाय.

टीम मॅनेजमेंटनं २०१९च्या वर्ल्ड कपवरही लक्ष दिलं पाहिजे. जर धोनीच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली नाही तर पर्यायाबाबत विचार करावा लागेल, असं वक्तव्य गांगुलीनं केलंय.

राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20नंतर धोनीच्या कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. बड्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कोहली मोठे शॉट्स मारत होता पण धोनी मात्र जलद रन्स बनवता आल्या नाहीत. यानंतर लक्ष्मण आणि आगरकरनं धोनीच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले. तर सेहवाग आणि गावस्कर यांनी मात्र धोनीची पाठराखण केली.

धोनीला खाली बॅटिंगला पाठवण्यापेक्षा ४ नंबरवर बॅटिंगला पाठवण्यात यावं, अशी मागणी गांगुलीनं केली आहे. धोनीला ४ नंबरवर बॅटिंगला पाठवलं तर त्याला पिचवर सेट व्हायला वेळ मिळेल आणि मग धोनीला आक्रमक खेळ करता येईल, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली आहे. कोहलीनं केलेल्या धोनीच्या समर्थनाबद्दलही गांगुलीनं भाष्य केलं आहे. कर्णधारानं दाखवलेल्या भरवशाचा फायदा खेळाडूला कामगिरी उंचावण्यासाठी होतो, असं गांगुली म्हणाला.