South Africa Team Against India : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता साऊथ अफ्रिकेचा (SA vs IND) संघ भारताविरुद्घ घरच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटची सिरीज खेळणार आहे. यासाठी आता साऊथ अफ्रिकेने टीमची (South Africa Team) घोषणा केली आहे. साऊथ अफ्रिकेने मोठे निर्णय घेतले असून कॅप्टन टेम्बा बावुमाची (Temba Bavuma) सुट्टी केली आहे. कर्णधार टेम्बा बावुमा आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांना एकदिवसीय आणि टी-20 मधून विश्रांती दिली असून एडन मार्करामकडे (Aiden Markram) भारताविरुद्धच्या टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता साऊथ अफ्रिका टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची तयारी करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
एडन मार्कराम (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नॅंद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सेन , हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर लुगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विल्यम्स.
एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्जर, टोनी डी जोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसेन, काइल व्हेरीन आणि लिझाद विल्यम्स.
टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरिन.
१० डिसेंबर २०२३: पहिला टी -२० सामना, डर्बन.
१२ डिसेंबर २०२३: दुसरा टी -२० सामना, ग्केबेरहा.
१४ डिसेंबर २०२३ : तिसरा टी -२० सामना, जोहान्सबर्ग.
१७ डिसेंबर २०२३: पहिला वनडे सामना, जोहान्सबर्ग.
१९ डिसेंबर २०२३ : दुसरा वनडे सामना, ग्केबेरहा.
२१ डिसेंबर २०२३: तिसरा वनडे सामना, पार्ल.
२६ ते ३० डिसेंबर, २०२३: पहिला कसोटी सामना, सेंच्युरियन.
३ जानेवारी ते ७ जानेवारी, २०२४: दुसरा कसोटी सामना, केपटाऊन.