मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना शुक्रवारी 27 नोव्हेंबरला 34 वर्षांचा होईल. डाव्या हाताच्या फलंदाजाने वाढदिवसाच्या आधी मोठी घोषणा केली आहे. काही शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी रैना एक महान काम करणार आहे. रैनाने त्याच्या 34 व्या वाढदिवशी 34 विविध शाळांमध्ये शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याचे वचन दिले आहे.
उत्तर प्रदेश, जम्मू आणि दिल्ली एनसीआरमधील एकूण 34 शाळांमध्ये शौचालयाव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे सुरेश रैना यांने म्हटलं आहे. ग्रेसिया रैना फाउंडेशनच्या माध्यमातून तो हा उपक्रम सुरू करणार आहे. अमिताभ शहा यांच्या सहकार्याने फाऊंडेशन हे काम करणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून या शाळांमध्ये शिकणार्या 10,000 हून अधिक मुलांना आरोग्य आणि स्वच्छता सुविधा मिळतील.
सुरेश रैनाने म्हणतो की "या पुढाकाराने माझा 34 वा वाढदिवस साजरा करतांना मला आनंद होत आहे. प्रत्येक मुलं दर्जेदार शिक्षणासाठी पात्र आहेत. शाळांमधील स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा त्यांचा हक्क आहे. मला आशा आहे तरुणांच्या सहकार्याने आम्ही ग्रेसिया रैना फाउंडेशन'च्या वतीने महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो."
सुरेश रैनाने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचा सहभाग नव्हता. लॉकडाऊन दरम्यान रैनाने बराच सराव केला आणि आयपीएलसाठी युएईमध्येही गेला, परंतु आठवड्याभरात परत आला.