T20 WC 2022: 'भारता'च्या कार्तिकची कमाल, घेतली हॅट्रिक

 कार्तिक टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (t 20 world cup 2022) हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला.   

Updated: Oct 18, 2022, 06:34 PM IST
T20 WC 2022: 'भारता'च्या कार्तिकची कमाल, घेतली हॅट्रिक title=

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचा (T 20 World Cup 2022) आजचा तिसरा दिवस आहे. सध्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाइंग राउंड सुरु आहे. मंगळवारी ए ग्रुपमध्ये नेदरलँडने नामिबियाचा पराभव केला. तर आज श्रीलंकेने यूएईवर 79 धावांनी विजय मिळवला. या दरम्यान भारतीय कार्तिकने कमाल कामगिरी केली. यूएईचा स्पिनर कार्तिक मयप्पनने हॅट्रिक घेण्याचा कारनामा केलाय. कार्तिक टी 20 वर्ल्ड 2022 मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.  (t 20 world cup 2022 sl vs uae united arab emirates karthik meiyappan take hat trick against sri lanka)

कार्तिकने सामन्यातील 15 व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या भानुका राजपक्षा, चरिथ असलंका आणि कॅप्टन दासुन शनाकाला आऊट करत हॅट्रिक साजरी केली.  यासह कार्तिक टी 20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा 5 वा गोलंदाज ठरलाय. 

कार्तिक जन्माने भारतीय  

मयप्पनचा जन्म 8 ऑक्टोबर 2000 रोजी चेन्नईतील तामिळनाडूत झाला. कार्तिकने 2019 मध्ये UAEकडून पदार्पण केलं. कार्तिकने 8 डिसेंबर 2019 ला  UAEसाठी वनडे डेब्यू केलं. हा सामना अमेरिकेविरुद्ध होता. यानंतर कार्तिकचा 2020 अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही त्याचा समावेश करण्यात आला.