SA vs NED: भारत सेमीफायनमध्ये दाखल; नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव

South Africa vs Netherlands T20 World Cup: नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव

Updated: Nov 6, 2022, 10:22 AM IST
SA vs NED: भारत सेमीफायनमध्ये दाखल; नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव  title=

SA vs Ned T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup 2022) रविवारी सकाळीच मोठा बदल पाहायला मिळाला आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला आहे ( Netherlands beats south africa t20 wc). नेदरलँड्सने ग्रुप 1 मधील त्यांच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 13 धावांनी पराभव करून सामना जिंकला आहे. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे याचा फायदा भारतीय संघाला (Team India) झाला आहे. भारतीय संघाने 6 गुणांसह स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र, भारताला आज अखेरचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध (India vs Zimbabwe) खेळायचा आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.

अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात दुबळ्या नेदरलँड (Netherlands) संघाने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 13 धावांनी पराभव केला. या निकालासह भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे. आता ग्रुप 2 मधून उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ कोण असेल? हे पाकिस्तान (pakistan) आणि बांगलादेश (bangladesh) यांच्यातील सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत पोहोचेल. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने ग्रुप-1 चे (Group 1) संपूर्ण समीकरणच बदलून गेले आहे.

भारतीय संघाचा शेवटचा ग्रुप स्टेजमधील सामना आज झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. त्यामुळे जरी भारतीय संघ हा सामना हरला तरी तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. कारण भारतीय संघ्या सध्या 6 गुणांसह  ग्रुप-2 मध्ये अव्वल स्थानावर आहे. तर आफ्रिका संघ 5 गुणांसह बाद स्पर्धेतून बाहेर पडला आहे.