T20 World Cup 2021 | रोहितला ओपनिंगवरुन हटवल्यानं दिग्गज संतापला, म्हणाला....

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव झाला.

Updated: Nov 2, 2021, 08:04 PM IST
T20 World Cup 2021 | रोहितला ओपनिंगवरुन हटवल्यानं दिग्गज संतापला, म्हणाला....  title=

मुंबई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचा मार्ग कठीण झाला. आधी पाकिस्तानकडून 10 विकेट्सने लाजीरवाणा पराभव त्यानंतर किंवींनी मिळवलेल्या विजयामुळे टीम इंडियाची नाचक्की झाली. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने असंख्य चुका केल्या. यामध्ये ओपनिंग जोडी बदलण्याचा निर्णय हा टीम इंडियाला महागात पडला. न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर कर्णधार म्हणून विराट कोहलीने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने (Mahela Jayawardene) संताप व्यक्त करत कोहलीवर भडकला आहे. (T20 World Cup 2021 India vs New zealand former sri lankan captain Mahela Jayawardene reaction over to top order changes)

जयवर्धननेने रोहित शर्माला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात बॅटिंगसाठी खालच्या क्रमांकावर पाठवण्यावरुन प्रश्न उपस्थित केला आहे. रोहित 2013 पासून सलामीला खेळतो. पण या सामन्यात मात्र रोहित तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. या सामन्यात केएल राहुल आणि ईशान किशन ही जोडी सलामीला आली होती. तर रोहित तिसऱ्या क्रमांकावर आला होता.   

जयवर्धने काय म्हणाला? 

शीर्ष क्रमात बदल केल्यानंतरही अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव झाला. यामुळे आता टीम इंडियाचं टॉप 4 मधील स्थानही इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. "तुम्ही बदल करु शकता. पण पहिल्या 3 फलंदाजांच्या क्रमात बदल करण्याची आवश्यकता नव्हती. बहुतांश संघांनी आपल्या टॉप ऑर्डरमध्ये बदल केला नाही कारण हेच फलंदाज तुम्हाला सुरुवातीला वेगाने धावा करुन चांगली सुरुवात मिळवून देतात",असं जयवर्धनने म्हंटलं.