टी -20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! संघाचे हे स्टार खेळाडू ठरतायत फ्लॉप

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणारे अनेक खेळाडू आतापर्यंत फ्लॉप ठरले आहेत.

Updated: Sep 25, 2021, 04:00 PM IST
टी -20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! संघाचे हे स्टार खेळाडू ठरतायत फ्लॉप title=

मुंबई : सध्या दुबईमध्ये आयपीएल मॅचेस सुरू आहेत. ज्यामध्ये काही खेळाडू आपली धमाकेदार कामगिरीने सगळ्यांना थक्क करत आहेत. तर काही खेळडूंकडून हवा तसा खेळ पाहायला मिळत नाही. पुढील महिन्यापासून युएई आणि ओमानमध्ये टी 20 वर्ल्ड कप 2021 होणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी, बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी युवा आणि अनुभवी खेळाडूंचा एक उत्तम संघ निवडला आहे. 

परंतु आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणारे अनेक खेळाडू आतापर्यंत फ्लॉप ठरले आहेत आणि ही बातमी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे, कारण खेळाडूंचा फ्लॉप खेळ टीम इंडियासाठी मोठं अडचणीचं ठरु शकतं.

मुंबई इंडियन्सच्या अनेक खेळाडूंना भारताच्या विश्वचषक संघात संधी देण्यात आली आहे. मुंबईचा संघ आणि खेळाडू दोघेही आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात फ्लॉप झाले आहेत. सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांची वर्ल्डकपसाठी निवड झाली आहे. वाईट गोष्ट म्हणजे हे खेळाडू आत्तापर्यंत काही विशेष करू शकले नाहीत.

बुमराहलाही दोन्ही सामन्यांमध्ये खूप फटका बसला होता. हे पाहावे लागेल की या खेळाडूंची निवड करून निवडकर्त्यांनी कोणतीही चूक केली नाही ना?

या खेळाडूंचे काय झाले?

त्याचबरोबर, अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आले नाही, पण त्यांचा सध्याचा फॉर्म बऱ्यापैकी चांगला आहे. या खेळाडूंमध्ये पहिले नाव अनुभवी सलामीवीर शिखर धवनचे आहे. शिखरकडे सध्या आयपीएल 2021 ची ऑरेंज कॅप आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणेच धवन दुसऱ्या टप्प्यातही हिट ठरला आहे. श्रेयस अय्यरही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. याशिवाय दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांची कामगिरीही खूप चांगली झाली आहे. पण या खेळाडूंना वर्ल्ड कप संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

वर्ल्ड कप पुढील महिन्यापासून आहे

पुढील महिन्यापासून 2021 चा वर्ल्ड कप यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाईल. वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून खेळला जाईल. भारत आपला पहिला सामना 24 ऑक्टोबरला सर्वात मोठा शत्रू पाकिस्तानशी खेळणार आहे. आयपीएल 2021 नंतर भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल. आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.