ये क्या हुआँ भाई! बांगलादेशचा संघ सामना जिंकलां पण शेवटचा चेंडूमुळे पुन्हा एकदा...

T20 World Cup 2022 Bangladesh vs Zimbambwe: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 12 फेरीत उलटफेर होत आहेत. नवा ड्रामा देखील समोर येत आहे. नो बॉल वाद ते दुबळ्या संघांकडून बलाढ्य संघांचा पराभव क्रिकेटप्रेमींनी अनुभवला आहे. असाच एक ड्रामा बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात पाहायला मिळाला.

Updated: Oct 30, 2022, 12:31 PM IST
ये क्या हुआँ भाई! बांगलादेशचा संघ सामना जिंकलां पण शेवटचा चेंडूमुळे पुन्हा एकदा... title=

T20 World Cup 2022 Bangladesh vs Zimbambwe: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 12 फेरीत उलटफेर होत आहेत. नवा ड्रामा देखील समोर येत आहे. नो बॉल वाद ते दुबळ्या संघांकडून बलाढ्य संघांचा पराभव क्रिकेटप्रेमींनी अनुभवला आहे. असाच एक ड्रामा बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात पाहायला मिळाला. बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशनं 20 षटकात 7 गडी गमवून 150 धावा केल्या आणि विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं. पण झिम्बाब्वेचा संघ 8 गडी गमवून 147 धावा करू शकला आणि 3 धावांनी पराभव झाला. पण खरा थरार रंगला तो शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेला 5 धावांची आवश्यकता होती. मात्र झिम्बाब्वेच्या खेळाडूने शेवटचा चेंडू मारला आणि त्यावर एक धाव आली. इथूनच पुढे ड्रामा घडला.

झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात 16 धावांची आवश्यकता होती. बांगलादेशच्या कर्णधाराने शेवटचं षटक मोसाद्देकच्या हाती सोपवलं. पहिला चेंडूवर ब्लरनं लेग बाय करत एक धाव काढली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईकला असलेल्या इव्हन्स त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या एनगारवानं तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला आणि चौथ्या षटकार ठोकला. पण पाचव्या चेंडूवर बाद झाला. सहाव्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता होती. मुसाद्देकनं मुझराबानीला चेंडू टाकला आणि एक धाव आली. बांगलादेशच्या खेळाडूंनी विजयी जल्लोष केला. एकमेकांना हस्तांदोलन करत मैदानाबाहेर पडले. पण खरा ड्रामा इथे सुरु झाला. पंचांना शेवटचा चेंडू नो घोषित केला आणि आनंदावर विरजन पडलं. सर्व खेळाडू पुन्हा मैदानात उतरले. एक चेंडू तीन धावा असा थरार रंगला. पण मुझारबानीला शेवटच्या चेंडूवर एकही धाव घेतला आली नाही. हा सामना झिम्बाब्वेनं तीन धावांनी जिंकला.

या विजयासह बांगलादेशचं संघ गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशच्या विजयामुळे पाकिस्तानची उपांत्य फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. झिम्बाब्वे आणि बांगलादेश संघामुळे पाकिस्तानचं गणित बिघडलं आहे.