'तुम्ही काही पण खा! फक्त RCBला ट्रॉफी मिळवून द्या' किंग कोहलीकडे फॅन्सची अजब मागणी

विराट कोहली वीगन की व्हेजिटेरियन, सोशल मीडियावर रंगलेल्या वादानंतर फॅनकडून अजब मागणी  

Updated: Jun 2, 2021, 11:38 AM IST
'तुम्ही काही पण खा! फक्त RCBला ट्रॉफी मिळवून द्या'  किंग कोहलीकडे फॅन्सची अजब मागणी title=

मुंबई: विराट कोहलीने अंड खाण्यावरून सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याने आपल्या डाएटच्या सवयीबद्दल खुलासा केला होता. त्याने सांगितले की तो अंडीही खातो. ''कोहली हा अंडी खाणारा शाकाहारी माणूस आहे ', अशी टीका सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सुरू केली.

हा वाद वाढल्यानंतर कोहलीनं ट्वीट करून याबद्दल देखील स्पष्टीकरण दिलं आहे. मी कधीच वीगन असल्याचा दावा केला नाही. मी कायम व्हेजिटेरियन असल्याचं सांगितलं आहे असंही कोहली म्हणाला. दीर्घ श्वास घ्या आणि व्हेजिटेबल्स खा! असंही कोहलीनं सांगितलं आहे.

कोहलीच्या या स्पष्टीकरणावर देखील युझर्सनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. एका युझरने तर कोहलीला अजब मागणी केली आहे.' सर तुम्ही काही पण खा पण रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ट्रॉफी मिळवून द्या' अशी मागणी एक युझरने केली आहे.  तर दुसऱ्या युझरने म्हटलं की तुम्ही काहीही खा पण एक शतक ठोका'

विराट कोहली इंग्लंड दौऱ्यासाठी तयारी करत आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम कसोटी सामना होणार आहे. तर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियासाठी हा इंग्लंड दौरा महत्त्वाचा आहेच. त्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान UAEमध्ये उर्वरित 31 आयपीएलचे सामने आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर पुन्हा टी 20 वर्ल्ड कपची तयारी असं शेड्युल व्यस्त असणार आहे.