टी 20 वर्ल्ड कपनंतर हे खेळाडू संन्यास घेण्याच्या तयारीत? पाहा लिस्टमध्ये कोण

टीम इंडियातील या खेळाडूंचं करिअर धोक्यात, टी 20 वर्ल्ड कपनंतर संन्यास घेणार? लिस्टमध्ये दिग्गज खेळाडूंची नावं

Updated: Jul 16, 2022, 12:52 PM IST
टी 20 वर्ल्ड कपनंतर हे खेळाडू संन्यास घेण्याच्या तयारीत? पाहा लिस्टमध्ये कोण title=

मुंबई : टीम इंडियाकडून खेळण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं. काहींना ही संधी मिळते. तर काहींच्या हातून ही संधी गमावली जाते. यंदा टी 20 वर्ल्ड कप अधिक चुरशीचा होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या हाती टीम इंडियाची कमान आणि नव्या दमाचे खेळाडू टीमकडे आहेत. 

याचवेळी टीम इंडियाचे काही जुने दिग्गज खेळाडू टी 20 वर्ल्ड कपनंतर संन्यास घेऊ शकतात अशी चर्चा आहे. हे खेळाडू कोण आहे यांच्याबद्दल जाणून घेऊया. 

मोहम्मद शमी : रोहित शर्माच्या हाती टीम इंडियाची कमान आल्यापासून तो अनेक नवख्या खेळाडूंना आजमावत आहे. मोहम्मद शमीला गेल्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर ठेवलं जात आहे. शमीच्या जागी हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह यांना संधी दिली जात आहे. 

शमीने भारताकडून 17 टी-20 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये त्याला तितकेसे यश मिळालेले नाही. मॅनेजमेंट हळूहळू त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. 

शिखर धवन : शिखर धवनकडे धडाकेबाज फलंदाज म्हणून पाहिलं जातं. मात्र शिखर धवन मधल्या काळात खराब फॉर्ममधून जात होता. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याला खेळवण्यात आलं नव्हतं. गेल्या अनेक दिवसांपासून तो टीम इंडियातून बाहेर होता. आता इंग्लंड विरुद्ध वन डे सीरिजमध्ये त्याला संधी देण्यात आली. 

शिखर धवनच्या जागी के एल राहुलला संधी दिली जात आहे. तर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना देखील खेळण्याची संधी दिली जात आहे. त्यामुळे शिखर धवन देखील संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये रविचंद्रन अश्विनला निवड समितीने संधी दिली. जेव्हापासून कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) निवृत्त झाला आहे तेव्हापासून त्याला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण झालं आहे. 

निवडकर्त्यांनी अश्विनकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. टी-20 क्रिकेटमध्ये तो धावा वाचवण्यावर अधिक भर देतो. रविचंद्रन अश्विनने टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून 51 टी-20 सामन्यांमध्ये 61 विकेट घेतल्या आहेत. तो देखील येत्या काही दिवसांत संन्यास घेणार असल्याची चर्चा आहे.