फुटबॉल विश्वातील आजवरची सर्वात मोठी डील: या खेळाडूची संपत्ती पाहून व्हाल अवाक

....या खेळाडूला आपल्या संघात आणण्यासाठी PSGने तब्बल 1673 कोटी रूपये खर्च करण्यात आले

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 5, 2017, 02:31 PM IST
फुटबॉल विश्वातील आजवरची सर्वात मोठी डील: या खेळाडूची संपत्ती पाहून व्हाल अवाक title=
फुटबॉलपटू नेमार

नवी दिल्ली : जगविख्यात फुटबॉलपटू नेमार हा फ्रान्सचा क्लब Paris St Germainचा अधिकृत खेळाडू बनला आणि त्याच्या जगभरातील चाहत्यांनी मोठा आनंद साजरा केला. ही घटना म्हणजे एका खेळाडूची निवड इतकी मर्यादित मुळीच नाही. तर, जगाच्या फुटबॉलविश्वातील आजवरची सर्वात मोठी डील म्हणूनही या घटनेकडे पाहिले जात आहे. नेमारच्या या निवडीमुळे अवघे फुटबॉल विश्व ढवळून निघाले आहे. कारण एखादा खेळाडू निवडताना इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा कोणत्याच फुटबॉलपटूला दिला गेला नाही. म्हणूनच ही फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी डील ठरली आहे.

नेमारला किती पैसे मिळाले?

या डीलनंतर नेमारच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली असून, प्रत्येक आठवड्याला नेमारला किमान 8 कोटी रूपयांची कमाई होणार आहे. याचाच अर्थ असा की, नेमारच्या एका मिनीटाची किंमत कमीत कमी 8 हजार रूपये इतकी असणार आहे. इतकेच नव्हे तर, नेमारचा क्बलसोबतचा प्रत्येक सेंकद हा 130 रूपयांच असेल. त्यामुळे हे आकडे विचारात घेता तुमच्या लक्षात आलेच असेल की, नेमारच्या या डीलने अनेक खेळाडूंना पाठिमागे टाकत संपत्तीचा एक उच्चांक प्रस्थापीत केला आहे.

फुटबॉल विश्वात गाजलेली तीन डील

  • नेमारला आपल्या संघात आणण्यासाठी PSGने तब्बल 1673 कोटी रूपये खर्च केले.
  • यापूर्वी पॉल पॉग्बासाठी मोठी रक्कम मोजण्यात आली होती. मॅंचेस्टर युनायटेडने पॉग्बावर 742 कोटी रूपये खर्च केले होते.
  • गॅराथ बेलसाठी रियाल मॅड्रिडने 709 कोटी रूपये खर्चून टॉटनहमकडून खरेदी केले होते.

दरम्यान, आपल्या निवडीबाबत बोलताना नेमारणे म्हटले आहे की, आयुष्यात पूढे कोणतेच आव्हान नव्हते. केवळ याच करणासाठी मी बार्सिलोन क्लब सोडला. मला पैशाने कधीच आकर्षीत केले नाही. मी केवळ माझ्या ध्येयासाठी काम करत राहिलो. दरम्यान, नेमारने जरी अशी प्रतिक्रीया दिली असली तरी, फुटबॉल विश्वच नव्हे तर, बाहेरील जगही अवाक झाले आहे. लोकांचे म्हणने असे की, एखाद्या फुटबॉलपटूसाठी कोणी इतकी मोठी रक्कम देऊच कसे शकते.  

नेमारला PSG क्लबसाठी 10 नंबरची जर्सी देण्यात आली आहे. जर नेमारच्या एखाद्या चाहत्यांना त्याच्या नंबरचा टी-शर्ट खरेदी करायचा असेल तर, त्यासाठी त्या चाहत्याला तब्बल 10 हजार 800 कोटी रूपये खर्चावे लागतील. आता इतके पैसे खर्च केलेत म्हटल्यावर उत्सुकता तर, वाढणारच ना.पण, नेमारची मैदानावरची कामगिरी कशी राहील हे मात्र, येणारा काळच सांगेन. त्यासाठी आपणास काही काळ वाट पहावी लागेल, हे नक्की.