पहिल्या टी-20 सामन्यात या 2 खेळाडूंचा होणार पत्ता कट!

जाणून घेऊया आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाचं Playing 11 कसं असणार आहे.

Updated: Feb 16, 2022, 08:31 AM IST
पहिल्या टी-20 सामन्यात या 2 खेळाडूंचा होणार पत्ता कट! title=

मुंबई : वेस्ट इंडिजला वनडेमध्ये क्लिन स्विप दिल्यानंतर आता टीम इंडिया टी-20 सामन्यांसाठी तयार आहे. टी-20 सिरीजमधील पहिला सामना आज होणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात टीम इंडियामध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. जाणून घेऊया आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाचं Playing 11 कसं असणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्याची दाट शक्यता आहे. ईशान किशनला सलामीला संधी दिली जाणार नाही. तर कदाचित पहिल्या T20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड सलामीसाठी मैदानात उतरणार आहेत. 

बीसीसीआय ऋतुराज गायकवाडला रोहित शर्माचा नवा ओपनर म्हणून मैदानात उतरवणार आहे. ऋतुराज गायकवाड सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाचे फलंदाजी कोच विक्रम राठोर म्हणाले की, केएल राहुल बाहेर असल्याने या परिस्थितीत आमच्याकडे पर्याय म्हणून ऋतुराज गायकवाड आहे.

ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या टीमकडून खेळतो. ऋतुराज गायकवाडने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक 635 रन्स केले होते. शिवाय ऑरेंज कॅपचा देखील तो मानकरी ठरला होता. यावेळी त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली होती.

तर दुसरीकडे विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. तर विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतची चौथ्या क्रमांकावर खेळेल. पाचव्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव उतरू शकतो. अशावेळी कर्णधार रोहित शर्मा श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची शक्यता आहे.