भारताच्या पराभवासाठी हा 1 बॉल ठरला कारणीभूत

या एका बॉलमुळे झाला भारताचा पराभव

Updated: Aug 5, 2018, 10:07 AM IST
भारताच्या पराभवासाठी हा 1 बॉल ठरला कारणीभूत title=

बर्मिंघम: इंग्लंडमध्ये टीम इंडियाने 5 टेस्ट सामन्यांमधली पहिली टेस्ट गमावली आहे. भारताचा 31 रनने पराभव झाला. विजयाच्या खूपच जवळ पोहोचलेल्या भारताला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या इनिंगमध्ये कर्णधार विराट कोहली आउट झाल्यानंतर इंग्लंडचा विजय मिळवणं सोपं झालं. विराट कोहली दुसऱ्या इनिंगमध्ये ज्या बॉलवर आऊट झाला तो या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. पण सामना पूर्ण झाल्यानंतर कळालं की, तिसऱ्या दिवशीच या एका बॉलमुळे सामना इंग्लंडच्या बाजुने झुकला होता.

या सामन्यामध्ये इंग्लंडच्या सॅम कुरैनने चांगली कामगिरी केली. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडला विजय मिळवणं सोपं झालं. पहिल्या सामन्यात 13 रनची लीड असणाऱ्या इंग्लंड टीमने जेव्हा 87 रनवर 7 विकेट गमवले तेव्हा सामना भारताच्या बाजुने होता. 

इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 38व्या ओव्हरमध्ये इंग्लंडचा स्कोर 7 विकेटवर 107 रन होता. मोहमद शमीच्या बॉलवर सॅम कुरैनने शॉट मारला पण तो बॉल स्लिपवर उभ्या असलेल्या शिखर धवनकडे गेला. शिखर धवनने ही संधी गमवली. सॅम यावेळी 13 रनवर खेळत होता. त्यानंतर त्याने 63 रन केले. सॅमच्या या 50 रनच्या अधिक भरामुळे इंग्लंड हा सामना जिंकू शकला.