टिफनी अब्रियू : पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉलपटू, ऑलिम्पिक गाजविण्याचे लक्ष्य

ही आहे टिफनी अब्रियू. जगातील पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉल खेळाडू.  आता ती पुरूष नव्हे तर, महिला खेळाडू म्हणून पुढे येत आहे.  

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 25, 2017, 01:14 PM IST
टिफनी अब्रियू : पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉलपटू, ऑलिम्पिक गाजविण्याचे लक्ष्य title=

मुंबई : ही आहे टिफनी अब्रियू. जगातील पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉल खेळाडू. वय वर्ष 33. टिफनी सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकतीच तिने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली. आता ती पुरूष नव्हे तर, महिला खेळाडू म्हणून पुढे येत आहे. तिला ऑलिंम्पीकमध्ये महिला संघाकडून दमदार कामगिरी किरायची आहे.

25 पॉईंट्सची दमदार कामगिरी

टिफनीने नुकतीच ब्राझीलची हॉलिबॉल सूपरलीग गाजवली. टिफनीने आतापर्यंत ब्राझीलकडून यूरोपातील अनेक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण, विशेष असे की, आजवर तीने जे व्हॉलिबॉलचे सामने खेळले आहेत ते सगळे पुरूष खेळाडू म्हणून खेळले गेले आहेत. काही काळापूर्वीच तिने वोली बोरू संघाकडून खेळताना चक्क 25 पॉईंट्सची दमदार कामगिरी केली. तिच्या या कामगिरीमुळे पिनेरियोसला 3-01 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.

ऑलिम्पिकमध्ये मिळणार संधी

दरम्यान, टिफनीला आशा आहे की, ब्राझीलचे सुप्रसिद्ध प्रशिक्षक जोस रोबर्टो तिला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची जरूर संधी देतील. महत्त्वाचे असे की, ऑलिम्पिक चॅम्पीयन रोबर्टो यांनीही आपल्या मुलाखतीत म्हटले होते की, टिफनीला ऑलिम्पीक खेळासाठी नकार द्याव, असे कोणतेही कारण सध्यातरी दिसत नाही.

टीका झाली म्हणून कशासाठी थांबायचे?

स्वात:च्या व्यक्तिगत आयुष्याबाबत बोलताना टिफनी अब्रियू सांगते की, माझी आई मला आजही माझ्या जुन्याच रोडरिगो नावाने हाक मारते. मला तिच्यासमोर जायला केव्हाच भीती वाटली नाही. कारण, मी माझा निर्णय यापूर्वीच तिला सांगितला होता. आता ती माझ्यावर पहिल्यापेक्षाही अधिक प्रेम करते. आता राहील गोष्ट लोकांची. तर, लोकांना काही कामधंदे नसतात त्यामुळे ते टीका करत बसतात. पण, मला वाटते की, आपल्यावर टीका झाली म्हणून आपण थांबण्याचे काहीच कारण नाही.

पुरूषांच्या संघामध्ये खेळूनही जिंकले अऩेक अवॉर्ड

दरम्यान, अब्रियूने या आधी पुरूषांच्या संघातूनही (लिंगबदल करण्यापूर्वी)  दमदार कामगिरी केली आहे. तिने 2012 पर्यंत ब्राझील, पोर्तुगाल, फ्रान्स, इंडोनेशिया, स्पेन, फ्रान्स, हॉलंड आणि बेल्जियम सारख्या अनेक वेगवेगळ्या व्हॉलिबॉल टूर्नामेंटमद्ये भाग घेतला आहे. अर्थात, त्यावेळी तिने लिंगबदल केला नव्हाता. त्यामुळे अर्थातच ती तेव्हा पुरूष म्हणून खेळत होती. दरम्यान, एकदा व्हॉलिबॉल खेळणे बंद करण्याचाही विचार तिच्या मनात आला होता. मात्र, नंतर तिने तो विचार झटकून टाकला आणि तिने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली. आता ती महिला संघाकडून ऑलिम्पिकमध्ये खेळू इच्छिते.