IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्स ने केला हैदराबादचा खिसा रिकामा, ऑस्ट्रेलियाच्या 'या' प्लेयरवर पैश्यांचा पाऊस

IPL Auction 2024 Travis Head: ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकवणारा ट्रेविस हेड (Travis Head ) यंदाच्या आयपीएलमध्ये मालामाल झाल्याचं पहायला मिळालंय. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याला हैदराबाद संघाने आपल्यात ताफ्यात सामील करून घेतलंय

Updated: Dec 19, 2023, 03:35 PM IST
IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्स ने केला हैदराबादचा खिसा रिकामा, ऑस्ट्रेलियाच्या 'या' प्लेयरवर पैश्यांचा पाऊस title=
IPL 2024 Auction, Travis Head

Travis Head Sold to the Sunrisers Hyderabad : सध्या दुबईत सुरू असलेल्या आयपीएल लिलावात 10 फँचायझीमध्ये चढाओठ पहायला मिळाली आहे. या आयपीएल लिलावात काही खेळाडू मालमाल झाल्याचं रहायला मिळालंय. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याला हैदराबाद संघाने आपल्यात ताफ्यात सामील करून घेतलंय. ट्रॅव्हिस हेड याची बेस प्राईज 2 कोटी होती. त्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराईजर्स हैदराबाद यांनी संघात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. 

वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या हेडसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात चुरस रंगलेली पहायला मिळाली. हैदराबादने सुरूवातीपासून ट्रेविस हेडसाठी बोली लावली. मात्र, चेन्नईने देखील इंटरेस्ट दाखवला. अखेर हैदराबाद संघाने त्याला 6 कोटी 80 लाख रूपयांना खरेदी केलं. बोली 6 कोटी गेल्यावर दोन्ही संघांमध्ये बोलणी सुरू झाली. मात्र, हैदराबादने अखेर बाजी मारली.

सनरायझर्स हैदराबादने श्रीलंकेचा स्टार स्पिनर वानिंदू हसरंगा याच्यावर देखील दाव लावला असून 1.5 कोटींना त्याला खरेदी केलं आहे. तर ट्रेविस हेडच्या बदल्यात चेन्नईने रचिन रविंद्र आणि शार्दुल ठाकूर याला संघात स्थान दिलं आहे.