Ind Vs Pak सामन्यात खेळाडूंपेक्षा 'या' महिलेनेच वेधलं लक्ष...Video पाहून, तुम्ही म्हणाल क्या बात!

 Ind Vs Pak सामन्यात खेळाडूंपेक्षा एका महिलेनेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral)होतो आहे. 

Updated: Aug 29, 2022, 12:25 PM IST
Ind Vs Pak सामन्यात खेळाडूंपेक्षा 'या' महिलेनेच वेधलं लक्ष...Video पाहून, तुम्ही म्हणाल क्या बात! title=
trending video ind vs pak stadium aunty danced video viral on social media

Ind Vs Pak Viral Video: दुबईमध्ये रंगलेली टीम इंडिया आणि पाकिस्तानमधील टी20 मॅचने अख्खा भारतीयांचा रविवार एकदम खास करुन टाकला. हार्दिक पांड्याच्या त्या सिक्सरने पाकिस्तानला धुळ चारली. या विजयानंतर क्रिकेटप्रेमींनी मोठा उत्साह दिसून आला. चाहत्यांनी विजयानंतर एकच जल्लोष केला. Ind Vs Pak सामन्यात खेळाडूंपेक्षा एका महिलेनेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral)होतो आहे. 

या व्हिडीओमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर एक काकू जबरदस्त डान्स करताना दिसून आली.व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आंटी आनंदात स्टेडियममध्ये नाचताना दिसत आहे. सोशल मीडियावर या आंटीच्या डान्सचं खूप कौतुक होतं आहे. यूजर्सने डान्सवर मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत.(trending video ind vs pak stadium aunty danced video viral on social media)

टीम इंडियाच्या विजयावर भारतीय चाहत्यांचा जल्लोष

आंटीच्या डान्सचा हा व्हिडिओ प्रयाग नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की,यावेळी प्रत्येक भारतीय. आतापर्यंत 56 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर अडीच हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केला आहे.

नेटिझन्सचा मजेशीर प्रतिक्रिया

विशेष म्हणजे आंटीच्या व्हिडिओवर नेटिझन्सही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. आंटीच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने ट्विट केले की, 'हे इतके व्हायरल होण्याची गरज नव्हती.'