अंडर 19 वर्ल्डकप : बांगलादेशला हरवत भारत सेमीफायनलमध्ये

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम राखताना सेमीफायनलमध्ये मजल मारलीये.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 26, 2018, 10:01 AM IST
अंडर 19 वर्ल्डकप : बांगलादेशला हरवत भारत सेमीफायनलमध्ये title=

क्विन्स्टन : अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम राखताना सेमीफायनलमध्ये मजल मारलीये.

क्वार्टरफायनलमध्ये भारताने बांगलादेशला 131 धावांनी पराभूत केले. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्व बाद 265 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशला केवळ 134 धावा करता आल्या. भारताकडून कर्णधार पृथ्वी शॉने 40, शुबमन गिलने 86 धावांची जबरदस्त खेळी केली. तर अभिषेक शर्माने 50 धावा केल्या.

या तिघांच्या खेळीच्या जोरावर भारताने 49.2 षटकांत सर्वबाद 265 धावा केल्या. बांगलादेशकडून पिनाक घोषने 43 धावा केल्या. त्यांचे इतर फलंदाज साफ अपयशी ठरल्याने बांगलादेशला या सामन्यात पराभव सहन करावा लागला.

सेमीफायनलमध्ये पाकिस्तानशी मुकाबला

क्वार्टरफायनलमध्ये भारताने बांगलादेशला हरवल्याने भारतालाच सेमीफायनलमध्ये पाकिस्तानशी मुकाबला होणार आहे. 30 तारखेला हा सामना रंगणार आहे.

भारताचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास

भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवले. त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे या दोन दुबळ्या संघांना सहज हरवले. त्यानंतर आता बांगलादेशला हरवत भारताने सेमीफायनल गाठलीये.