विराट कोहलीने असं केलं अजिंक्य रहाणेच्या खेळीचं कौतूक

रहाणेची पहिल्या डावात शानदार शतकीय खेळी

Updated: Dec 27, 2020, 06:30 PM IST
विराट कोहलीने असं केलं अजिंक्य रहाणेच्या खेळीचं कौतूक title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरु असलेल्या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शानदार शतकीय खेळी केली. रहाणेच्या खेळीनंतर टीम इंडियाने 82 धावांची आघाडी केली. सध्या रहाणे शतकासह क्रीजवर आहे आणि 104 धावांवर खेळत आहे.

अजिंक्य रहाणेच्या या खेळीचं विराट कोहलीने ही कौतूक केलं आहे. रहाणे बॅटींग करत असताना टीम इंडियाने पाच गडी गमावले होते. रविंद्र जडेजानेही रहाणेबरोबर चांगली खेळी केली. तो 40 रनवर खेळत आहे. दुसर्‍या  कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपल्यानंतर विराट कोहलीने ट्विट केले आणि लिहिले की, "आमच्यासाठी आणखी एक महान दिवस. सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेट. जिन्क्सकडून सर्वोत्तम खेळी.'

याआधीही भारतीय गोलंदाजांनी कांगारू संघाला 195 धावांवर बाद केल्यावर विराट कोहलीने टीम इंडियाचे कौतुक केले. दुसऱ्या दिवशीचा खेळ असताना 5 विकेट गमवत भारतीय संघ 277 रनवर खेळत आहे. भारताकडे सध्या 82 रनची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी जास्तीत जास्त रन करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.