IND vs PAK : विराटची बॅट तळपली, दिवाळी खरेदी थांबली

Updated: Oct 25, 2022, 09:20 AM IST

Virat_Kohli

Virat Kohli Diwali shopping : दिवाळी (Diwali 2022) म्हटलं शॉपिंग भरपूर शॉपिंग...बाजारात गेल्या काही दिवसांपासून दिवाळी खरेदीसाठी (Diwali shopping)  लोकांनी तोबा गर्दी केली आहे. रस्त्यावर पाय ठेवायला जागा नव्हती. त्यात सोमवारची दिवाळी असल्याने रविवारी तर लोकांनी खरेदीसाठी भारतातील वेगवेगळ्या मार्केट परिसरात एकच खरेदीसाठी रीघ लावली होती. भारतीयांनी रविवारी खरेदीसाठी सकाळी जाणं पसंत केलं. रविवारी विराटच्या वीरसेनेने भारतीयांना दिवाळी गिफ्ट दिलं. तर या दिवशी भारतीयांनीही एक वेगळाच इतिहास रचला. 

अशी केली भारतीयांनी कमाल!

बाजारात दिवाळीची खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तिथेच अनेकांनी मोबाईलवर ऑनलाईन खरेदी (Online shopping) केली. पण रविवारी टी-20 वर्ल्डकपमध्ये (T-20 World Cup) भारत - पाकिस्तान मॅच म्हटलं तर त्यासमोर भारतीयांना दिवाळीचंही खरेदी असो किंवा अजून काही...त्यांना त्यात रस नव्हता...शेवटच्या त्या 8 ओव्हरमध्ये जणू काही भारतीयांचा श्वास थांबला होता...हातातून निसटणारा विजय विराट कोहली खेचून आणतं होता. तिकडे विराट कोहलीची (Virat Kohli ) बॅट तळपली आणि भारतातली दिवाळी खरेदी थंडावली. (Virat Kohli batting Diwali shopping stopped and T-20 World Cup India and Pakistan match fever nmp)

युपीआयचे व्यवहार खाली, सोने खरेदीही थांबली

हो...हे घडलंय रविवारी टी-20 वर्ल्डकपमधल्या भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) दरम्यानच्या मॅचमध्ये.. दिवाळीच्या खरेदीसाठी लोकं सकाळीच मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले होते. तर तेवढ्याच मोठ्या संख्येनं लोकं ऑनलाईन शॉपिंगही करत होते. पण मॅच सुरु झाल्यानंतर ही खरेदी थंडावली. कारण लोकं मोबाईलवर आणि टीव्हीवर मॅच बघण्यात दंग होते. पण जेव्हा धावांचा पाठलाग करताना आव्हान अशक्य बनलं आणि विराटची बॅट तळपायला लागली तेव्हा मात्र ही खरेदी अक्षरक्ष थांबली. युपीआयचे व्यवहार थंडावले होते तर सोने खरेदीही थांबली होती. मॅच जिंकेपर्यंत अनेक दुकानांमध्ये व्यवहार थांबले होते. मॅच संपल्यानंतर मात्र ही खरेदी पुन्हा जोमात सुरु झाली.