सुजलेला डोळा, नाकावर बॅण्डेड अन्... विराट कोहलीला मारहाण? स्वत: शेअर केला फोटो

Virat Kohli Instagram Story: विराट कोहलीने शेअर केलेल्या या स्टोरीची सध्या सोशल मीडियावर चर्चा असून या स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. अनेकांना हे नक्की घडलंय तरी काय असा प्रश्न पडलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 28, 2023, 12:38 PM IST
सुजलेला डोळा, नाकावर बॅण्डेड अन्... विराट कोहलीला मारहाण? स्वत: शेअर केला फोटो title=
विराटची पोस्ट पाहून चाहत्यांना आलं टेन्शन

Virat Kohli Instagram Story: नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या विराट कोहलीने सोमवारी शेअर केलेल्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन इस्टाग्राम स्टोरीवर एक विचित्र फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये विराट कोहली पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट घालून दिसत आहे. मात्र विराटच्या चेहऱ्यावर काही जखमा दिसत आहे. त्याच्या नावावर बॅण्डेड लावण्यात आली आहे. असं असलं तरी विराटच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. रविवारी या 35 वर्षीय क्रिकेटपटूला इंडियन प्रिमिअर लिगच्या 2024 च्या पर्वासाठी रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या संघाने रिटेन केलं. त्यानंतर विराटने शेअर केलेल्या या पोस्टचे उलटसुलट अर्थ लावले जात आहेत.

नक्की विराटच्या स्टोरीत काय?

विराट कोहलीने, "तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पाहायला हवं होतं," अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे. विराटच्या या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेमकं काय म्हणायंच आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक पोस्ट व्हायरल झाल्यात. विराटची ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांना टेन्शन आलं आहे. पाहूयात अशाच काही पोस्ट...

1)

2)

3)

विराट यंदा आरसीबीबरोबरच...

रविवारी आयपीएलच्या 10 संघांनी त्यांच्या संघात कोण कायम राहणार याची यादी जाहीर केली. आयपीएलच्या लिलावाआधी कोणत्या खेळाडूंना आपण रिटेन करतोय आणि कोणाला करारमुक्त करतोय हे संघांकडून जाहीर करण्यात आलं. मागील वर्षी विराट कोहलीला अनेक संघांनी नाव लिलावासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी केली होती. मात्र विराटने आरसीबीबरोबर कायम राहण्याचा निर्णय घेतला. "मी याचा (नाव लिलावामध्ये टाकण्याचा) विचार केला होता. मला अनेकदा समोरुन यासाठी संपर्कही करण्यात आला. मी लिलावामध्ये सहभागी व्हावं यासाठी बरेच प्रयत्न झाले. मात्र मला नंतर जाणवलं की कोणी अरे हा खेळाडू चषक जिंकलाय अशा नावाने तुम्हाला ओळखत नाही. हे म्हणजे तुम्ही चांगले व्यक्ती असाल तर तुम्ही आहात, इतकं साधं आहे," असं म्हणत विराटने आरसीबीबरोबर राहण्याच्या निर्णयाबद्दल म्हटलं होतं.

पोस्टमागील तर्क काय?

दरम्यान, विराटने पोस्ट केलेला फोटो एका बूट बनवणाऱ्या कंपनीचं प्रमोशन असल्याचंही सांगितलं जात आहे. त्याने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तसा उल्लेखही दिसत आहे. याच ब्रॅण्डच्या एका जाहिरातीत फार सूट असल्याने खरेदीसाठी लोकांची हाणामारी होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याच जाहिरातीच्या कॅम्पेनचा हा पुढील भाग असल्याचं म्हटलं जातं आहे.