भारत-श्रीलंका टेस्ट सीरिज : विराट कोहलीने मोडला रिकी पॉंटिंगचा 'हा' रेकॉर्ड

भारत श्रीलंकेच्या दुसर्‍या टेस्ट मॅचमध्ये आज कर्णधार विराट कोहलीने १९ वे शतक ठोकले आहे. यासोबतच श्रीलंकेसमोर धावांचा मोठा टप्पा रचण्यास भारतीय संघ यशस्वी ठरला आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 26, 2017, 01:44 PM IST
भारत-श्रीलंका टेस्ट सीरिज  : विराट कोहलीने मोडला रिकी पॉंटिंगचा 'हा'  रेकॉर्ड  title=

नागपूर : भारत श्रीलंकेच्या दुसर्‍या टेस्ट मॅचमध्ये आज कर्णधार विराट कोहलीने १९ वे शतक ठोकले आहे. यासोबतच श्रीलंकेसमोर धावांचा मोठा टप्पा रचण्यास भारतीय संघ यशस्वी ठरला आहे. 

श्रीलंके समोर चौथे शतक 

२९ वर्षीय कोहलीने आज नागपूरमधील टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेविरूद्धचं चौथं शतक ठोकण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. तसेच दोन सामन्यातील ही त्याची दुसरी सेन्चुरी आहे. क्रिकेटमधील सारे फॉर्मॅट पाहता श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यांमध्ये विराटने ३००० धावांचा टप्पा पार केला आहे.   

१० वे इंटरनॅशनल शतक 

२०१७ सालातील विराटचे हे दहावे इंटरनॅशनल शतक आहे. हा कर्णधार म्हणून त्याचा विक्रम आहे. ऑस्ट्रेलिअन कॅप्टन रिकी पॉंटिंगने एका वर्षामध्ये दोनदा ९ शतकं ठोकली होती. मात्र विराट आता त्याच्या एक पाऊल पुढे गेला आहे.