FORBES : विराटची कमाई मेसीपेक्षा जास्त

फोर्ब्सनं जगभरातल्या खेळाडूंच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे.

Updated: Oct 26, 2017, 04:58 PM IST
FORBES : विराटची कमाई मेसीपेक्षा जास्त  title=

मुंबई : फोर्ब्सनं जगभरातल्या खेळाडूंच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे. खेळाडूचं वेतन, बोनस आणि जाहिरातींमधून मिळणाऱ्या रकेमवरून फोर्ब्सनं ही यादी बनवली आहे. या यादीमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं अर्जेंटीनाचा स्टार फूटबॉलपटू मेसीला मागे टाकलं आहे.

फोर्ब्सनं जाहीर केलेल्या या यादीमध्ये विराट कोहली १४.५ मिलीयन डॉलर कमवून सातव्या क्रमांकावर आहे. तर मेसीला नववं स्थान मिळालं आहे. फोर्ब्सच्या या यादीमध्ये स्वित्झर्लंडचा टेनीसपटू रॉजर फेडरर पहिल्या क्रमांकावर आहे. फेडररची कमाई तब्बल ३७२ मिलीयन डॉलर एवढी आहे.

जमैकाचा ऍथलिट उसेन बोल्ट फोर्ब्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तर फूटबॉलपटू क्रिस्टिआनो रोनाल्डो तिसऱ्या क्रमांकावर आहे. बास्केटबॉल खेळाडू लेब्रान जेम्स ३३.४ मिलियन डॉलर एवढ्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

फोर्ब्सच्या यादीनूसार खेळाडूंची वार्षिक कमाई

१ रॉजर फेडरर- ३७.२ मिलियन डॉलर

२ लेब्रान जेम्स- ३३.४ मिलियन डॉलर

३ उसेन बोल्ट- २७ मिलियन डॉलर

४ क्रिस्टिआनो रोनाल्डो- २१.५ मिलियन डॉलर

५ फिल मिकेलसन- १९.६ मिलियन डॉलर

६ टायगर वूड्स- १६ मिलियन डॉलर

७ विराट कोहली- १४.५ मिलियन डॉलर

८ रॉकी मॅकलेरॉय- १३.६ मिलियन डॉलर

९ लिओनेल मेस्सी- १३.५ मिलियन डॉलर

१० स्टिफन करी- १३.४ मिलियन डॉलर