Virat वर आली मक्के विकण्याची वेळ? फोटो व्हायरल होताच लोक म्हणतायत 'विराट कॉर्नली'

तो व्हिडीओ असो वा फोटो किंवा एखादी बातमी लोकं आपआपल्या इंट्रेस्ट प्रमाणे गोष्टी जाणून घेतात आणि शेअर करतात.

Updated: Jan 3, 2022, 03:20 PM IST
Virat वर आली मक्के विकण्याची वेळ? फोटो व्हायरल होताच लोक म्हणतायत 'विराट कॉर्नली' title=

मुंबई : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जेथे काही मिनिटांतच एखादी गोष्ट वाऱ्यासारखी पसरते. मग तो व्हिडीओ असो वा फोटो किंवा एखादी बातमी लोकं आपआपल्या इंट्रेस्ट प्रमाणे गोष्टी जाणून घेतात आणि शेअर करतात. यासगळ्यामुळे बऱ्याचदा होतं असं की, काही खोट्या गोष्टी किंवा बनावट गोष्टी देखील वाऱ्यासारख्या पसरतात आणि काही माणसं त्याला खरं देखील मानू लागतात.

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चाट विकतानाचा फोटो व्हायरल झाला होता. परंतु ते अरविंद केजरीवाल नसुन त्यांचा सारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत होता. जो ग्वाल्हेरचा चाट विक्रता आहे.

त्यानंतर असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे, जो भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचा आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे आणि त्यावर लोकांच्या अनेक प्रकारच्या खोचक प्रतिक्रियाही येत आहेत.

हा फोटो यो यो फनी सिंग नावाच्या हँडलवरून विराट कोहलीचा लूक लाइक असलेला एक फोटो ट्विटरवर ट्विट करण्यात आला आहे. या फोटोतील व्यक्ती चेहऱ्यावरून कोहलीसारखीच दिसत आहे. त्याने डोक्यावर काळी टोपी घातली आहे आणि त्याने अंगावर काळ्या आणि लाल रंगाचा स्वेटर घातला आहे. तो हातगाडीवर मका विकत आहे. परंतु हा व्यक्ती विराट कोहली नाही.

आतापर्यंत 2500 हून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे आणि अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. कोहलीचा लूकसारखा दिसणारा हा फोटो ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

याआधीही कोहलीच्या आणखी एका लूकचा फोटो व्हायरल झाला होता. त्याचवेळी रोहित शर्मा, अरविंद केजरीवाल आणि सलमान खानसह इतर अनेक सेलिब्रिटींसारखे दिसणारे लोकांचे फोटो व्हायरल झाले आहेत. कोहलीशी संबंधित जो फोटो व्हायरल होत आहे, तो कुठला आहे याची अद्याप समजलेले नाही.