Virat Kohli: चाहत्याने सेल्फी मागितल्यावर कोहलीने केलं असं की....; विराटवर चाहत्यांकडून अहंकारी असल्याची टीका

Virat Kohli : देशाच्या बाहेर देखील कोहलीचे बरेच चाहते आहेत. कोहलीच्या प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांची नजर असते. अशातच आता कोहलीचा ( Virat Kohli ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय, ज्यामध्ये चाहते त्याला घमेंडी म्हणतायत. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 12, 2023, 04:15 PM IST
Virat Kohli: चाहत्याने सेल्फी मागितल्यावर कोहलीने केलं असं की....; विराटवर चाहत्यांकडून अहंकारी असल्याची टीका title=

Virat Kohli: टीम इंडियाचा ( Team India ) स्टार क्रिकेटर आणि किंग कोहली विराट कोहलीचे ( Virat Kohli ) चाहते काही कमी नाहीत. देशाच्या बाहेर देखील कोहलीचे बरेच चाहते आहेत. कोहलीच्या प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांची नजर असते. अशातच आता कोहलीचा ( Virat Kohli ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय, ज्यामध्ये चाहते त्याला घमेंडी म्हणतायत. काय आहे हा नेमका हा व्हिडीओ पाहुयात. 

कोहलीने चाहत्यासोबत सेल्फी काढण्यास दिला नकार

नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये एका चाहत्याने टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीला ( Virat Kohli ) सेल्फी घेण्याची विनंती केली आहे. यावेळी या व्हिडीयोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो चाहता कोहली ( Virat Kohli ) सोबत सेल्फी घेण्यासाठी धावत येतो. मात्र कोहली या चाहत्यासोबत सेल्फी घेत नाही. 

धावत आल्यानंतर कोहली ( Virat Kohli ) काहीसा विचार करतो, मात्र त्यानंतर सेल्फी देण्यासाठी नकार देतो. यावेळी कोहली त्याला काहीतरी सांगताना दिसतोय. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झाला असून आता चाहत्यांनी मात्र कोहलीवर टीका करण्यास सुरुवात केलीये. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, कोहली अहंकारी आणि घमेंडी आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणतोय कोहली?

व्हिडिओमध्ये विराट कोहली ( Virat Kohli ) पुढच्या वेळी येईन तेव्हा नक्की सेल्फी घेऊ असं म्हणताना दिसतोय. यामध्ये विराट म्हणतो, मी ३० ऑगस्टला जातोय, मग सेल्फी घेऊ. कोहलीचे उत्तर ऐकल्यानंतर चाहता म्हणतो, ठीक आहे. यानंतर विराट गाडीतून निघून जातो. 

चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, कोहली इतका वेळ त्या फॅनशी बोलत असतो, त्या वेळेत सेल्फी काढून देऊ शकला असता. यानंतर कोहलीवर घमेंडी असल्याचे आरोप काही चाहते लावत आहेत. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर विराट कोहलीला  ( Virat Kohli ) आराम देण्यात आला आहे. आशिया कप आणि आगामी वनडे वर्ल्डकप पाहता विराट आणि रोहित शर्माला आराम देण्यात आल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे विराट आता आशिया कप 2023 मध्ये खेळताना दिसणार आहे. आशिया कप 2023 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्यात विराटची बॅट तळपणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.