विक्रमवीर विराटचा डाएट प्लान

प्रत्येक दिवशी वेगवेगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या विराट कोहलीचा फिटनेसही तेवढाच जबरदस्त आहे.

Updated: Oct 25, 2018, 09:52 PM IST
विक्रमवीर विराटचा डाएट प्लान title=

मुंबई : प्रत्येक दिवशी वेगवेगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या विराट कोहलीचा फिटनेसही तेवढाच जबरदस्त आहे. मोठी खेळी करण्यासाठी आणि एक-दोन रन धावून काढण्यासाठी फिटनेस महत्त्वाची भूमिका बजावतो. फिट राहण्यासाठी विराट कोहली मागच्या ४ महिन्यांपासून विराट वेगन बनला आहे. म्हणजेच विराटनं प्राण्यांपासून मिळणारं प्रोटीन खाणं बंद केलं आहे. विराटनं मांसहार, अंड याबरोबरच गाय, म्हैस आणि बकरीचं दूध घेणंही बंद केलं आहे. विराट दुधापासून बनलेलं पनीर, चीज, दही आणि आईसक्रीमही खात नाही.

विराट कोहली सध्या होल ग्रेन, डाळ, भुईमूग, बीज आणि फळांच्या माध्यमातून प्रोटीन घेतोय. याशिवाय विराट हिरवी पानं असलेल्या भाज्या, मोड आलेली कडधान्य, ठराविक तापमानात शिजवलेल्या भाज्या हा आहार विराट घेतोय. या डाएटमुळे पचन क्रिया मजबूत होते, असं मानलं जातं.

वेगन डाएटमुळे शरिराला आवश्यक कॅलरीज मिळतात आणि फॅट्सही जमा होत नाहीत. वेगन डाएट वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी असतं. या डाएटमुळे शरिरातील उर्जा वाढते, त्यामुळे थकवा जाणवत नाही. कारण या डाएटमध्ये प्रोटीन आणि आयर्न जास्त प्रमाणात असतं. 

विराट कोहली कैसे रहते हैं इतने Fit,कुछ ऐसा है Virat का डाइट प्लान!