IPL Auction 2021: 292 खेळाडूंमध्ये कुणाची होणार चांदी अन् कोणाला मिळणार संधी?

बीसीसीआयने 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढील हंगामासाठी लिलावात भाग घेणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. 

Updated: Feb 12, 2021, 02:10 PM IST
IPL Auction 2021: 292 खेळाडूंमध्ये कुणाची होणार चांदी अन् कोणाला मिळणार संधी?  title=

मुंबई: बीसीसीआयने 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढील हंगामासाठी लिलावात भाग घेणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. भारताचा ज्येष्ठ ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि मध्यम ऑर्डरचा फलंदाज केदार जाधव यांच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांना दोन कोटींच्या बोलीच्या गटात स्थान देण्यात आलं आहे.

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने खेळाडूंची संख्या कमी केली असून, त्यानंतर 292 खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत . 61 ठिकाणी ही बोली लावली जाणार आहे. त्यामध्ये 164 भारतीय तर 125 विदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. असोसिएट देशातील 3 खेळाडूंना ही संधी देण्यात आली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) मध्ये 13 खेळाडूंमध्ये सर्वाधिक स्लॉट शिल्लक आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) संघ केवळ 3 खेळाडू खरेदी करू शकणार आहेत.

किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघासाठी 53 कोटी 10 लाख रुपयाची रक्कम असणार आहे. तर हैदराबादजवळ 10 कोटी 75 लाख आहेत. चेन्नई सुपर किंग्सजवळ 22 कोटी 70 लाख असून 7 खेळाडूंचा स्लॉट अद्यापही शिल्लक आहे. त्यामुळे या संघाला कोण नवे खेळाडू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जने यंदा हरभजन सिंग आणि केदार जाधव यांना रिलीज केले आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन यांना सुधारित यादीत 20 लाख रुपयांच्या सर्वात कमी किंमतीच्या बोलीसाठी स्थान मिळाले आहे.

मॅक्सवेल आणि स्मिथ व्यतिरिक्त परदेशी खेळाडूंमध्ये शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड यांचा समावेश आहे. 1.5 कोटींच्या बोलिसाठी 12 खेळाडूंना स्थान मिळाले आहे तर भारतीय फलंदाज हनुमा विहारी आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव एक कोटी रुपयांच्या तिसर्‍या प्रकारात आहेत. आयपीएलचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे दुपारी 3 वाजता भारतीय वेळेत सुरू होईल.