पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराने केलं धोनीचं तोंडभरुन कौतुक

धोनीच्या वाढदिवसाच्या अगोदर धोनीचं कौतूक

Updated: Jul 7, 2020, 11:05 AM IST
पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराने केलं धोनीचं तोंडभरुन कौतुक  title=

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार वकार युनूसने भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचं कौतुक केलं आहे. वकार युनूसने धोनीला महान म्हटलं आहे. सौरव गांगुलीचा वारचा योग्य प्रकारे पुढे घेऊन गेला आहे. वकारने धोनीच्या वाढदिवसाच्या आधी ही गोष्ट म्हटलं आहे. धोनीचा आज 39 वा वाढदिवस आहे. जगभरातून त्याला शुभेच्छा येत आहेत. 'क्यू 20' या शोमध्ये वकार युनूसने धोनीचं खूप कौतुक केलं आहे.

वकारने म्हटलं की, गांगुलीने भारतीय क्रिकेटला एक दिशा दिली आणि धोनी त्याला आणखी पुढे घेऊन गेला. तो एक विश्व कप चॅम्पियन आहे. त्याने वर्ल्डकप जिंकला आहे. मला वाटतं की, त्याने देश, परिवार आणि आपल्यासाठी देखील शानदार कामगिरी केली आहे.

वकारने गांगुलीने भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदान स्वीकार करत म्हटलं की, कर्मधार म्हणून धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलला. कर्णधार म्हणून त्याने त्याची जबाबदारी चोख पार पाडली.'

World Cup record against India at the back of our mind: Pakistan ...

वकार म्हणतो की, 'एमएस धोनी एक शानदार क्रिकेटर आहे. ज्या प्रकारे तो टीमला पुढे घेऊन गेला. तो शब्दात सांगणं कठीण आहे. तो खूप छाऩ व्यक्ती आहे आणि मोठा खेळाडू आहे, जो वस्तूस्थिती जाणतो. धोनी एक अद्भुत व्यक्ती आहे. एका छोट्या गावातून आलेल्या या व्यक्तीने भारतीय क्रिकेटला जगात एका उंचीवर नेलं. त्यासाठी तो कौतुकाच पात्र आहे. इतक्या मोठ्या टीमचं नेतृत्व करणं खरंच खूप कौतुकास्पद आहे.'