बुमराह ग्रेट का आहे? पाकिस्तानी बॉलर्सवर टीका करत वसीम अक्रमने गायले गोडवे, म्हणतो...

Wasim Akram On Jasprit Bumrah : पाकिस्तानी बॉलर्सवर टीका करत वसीम अक्रम याने जसप्रीत बुमराहचं कौतूक केलं आहे. त्यावेळी त्याने पाकिस्तानी बॉलर्सची खरडपट्टी घेतली. 

सौरभ तळेकर | Updated: Nov 2, 2023, 11:22 PM IST
बुमराह ग्रेट का आहे? पाकिस्तानी बॉलर्सवर टीका करत वसीम अक्रमने गायले गोडवे, म्हणतो... title=
Jasprit Bumrah, Wasim Akram

ICC Cricket World Cup 2023 : टीम इंडियाने श्रीलंकेचा गुडघ्यावर टेकवून सेमीफायनलमध्ये (India into the Semis) दमदार एन्ट्री मिळवली आहे. फलंदाज तुम्हाला सामने जिंकवतात, तर गोलंदाज तुम्हाला मालिका जिंकवतात, असं म्हटलं जातं. याचाच अनुभव टीम इंडियाला आला आहे. टीम इंडियाच्या फास्टर गोलंदाजांनी श्रीलंकाच नव्हे तर इंग्लंडचे देखील पत्ते खोलले होते. अशातच आता वर्ल्ड कपमध्ये सर्वांना धडकी भरलीये ती भारतीय गोलंदाजांची. अशातच भारतीय गोलंदाजांच्या वर्ल्ड कपमधील दमदार कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज वसिम अक्रम (Wasim Akram) खूश झालाय. विशेषकरून अक्रमने जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) तोंडभरून कौतुक केलंय. नेमकं काय म्हणाला वसीम अक्रम पाहुया...

पाकिस्तानच्या वसीम अक्रमने जसप्रीत बुमराहला 'अद्वितीय गोलंदाज' म्हटलंय आणि एका पाकिस्तानी चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने बुमराहच्या गोलंदाजीचं कौतूक केलंय. जसप्रीत बुमराह एक वेगळ्या प्रकारचा गोलंदाज आहे. सध्या जगात कोणीही त्याच्यासारखी गोलंदाजी करत नाही, असं अक्रम म्हणाला आहे. पाकिस्तानचे गोलंदाज हे का करू शकत नाहीत? आम्ही जास्त वेळ खेळत नाही का? असा सवाल वसीम अक्रमने विचारलाय.

बुमराह कसोटी क्रिकेटही खेळतो. दुखापतीनंतर तो फक्त एकदिवसीय सामने खेळतो पण कसोटी क्रिकेटही खेळतो. त्यामुळेच तो इतका यशस्वी आहे. जोपर्यंत तुम्ही फलंदाजांना लांब फॉरमॅटमध्ये बाद करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही.  10 वर्षानंतर एकदिवसीय सामन्यात 40 व्या षटकापर्यंत खेळणं कठीण होऊ शकतं, असं वसीम अक्रम याने म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या 7 वर्ल्ड कप सामन्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बुमराह अव्वल स्थानी आहे. बुमराहने गेल्या 7 मॅचमध्ये 15 विकेट्स नावावर केल्या आहेत. तर शमीने फक्त 3 सामन्यात 14 विकेट्स नावावर केल्या आहेत. तर सिराजने 7 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्याही खेळाडूच्या मनात धास्ती तर बसणारच ना!!