Brody Couch Catch: कॅच सुटला, 3 वेळा अंगावर पडला तरीही पठ्ठ्यानं सोडला नाही बॉल, Video एकदा पाहाच

Melbourne Stars vs Sydney Thunder: सिडनी थंडला फक्त122 धावा करता आल्या. त्यानंतर 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्टार्सने पहिल्याच षटकात आघाडीच्या खेळाडूंना तंबूत धाडलं. मेलबर्न स्टार्सच्या (Brody Couch Catch Video) गोलंदाजांनी मॅच ताणून धरली. 

Updated: Dec 13, 2022, 08:07 PM IST
Brody Couch Catch: कॅच सुटला, 3 वेळा अंगावर पडला तरीही पठ्ठ्यानं सोडला नाही बॉल, Video एकदा पाहाच title=
Brody Couch Catch Video

Brody Couch Catch: सध्या ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगच्या (Big Bash League) 12 व्या हंगामाला दणक्यात सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय. 12 व्या हंगामातील (BBL12) पहिला सामना सिडनी थंडर (Sydney Thunder) आणि मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) यांच्यात खेळला गेला. कमी स्कोअरिंग हा सामना थ्रिलर राहिला. 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्सची तांरबळ उडाली. अशातच या सामन्यातील एक सुपर कॅच (Brody Couch Catch Video) व्हायरल होताना दिसतोय. (Watch Melbourne Stars Brody Couch takes a stunning one handed catch in Big Bash League marathi news)

सिडनी थंडला फक्त122 धावा करता आल्या. त्यानंतर 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्टार्सने पहिल्याच षटकात आघाडीच्या खेळाडूंना तंबूत धाडलं. मॅथ्यू गिल्क्स (Matthew Gilkes) आणि रिली रॉसौ (Rilee Rossouw) यांना भोपळा देखील फोडता आला नाही.  ट्रेंट बोल्टने (Trent Boult) धारदार गोलंदाजी करत पहिल्याच सामन्यात लाज राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिडनीने हा सामना 9 विकेट राखून जिंकला.

आणखी वाचा - FIFA WC 2022: मिस्ट्री गर्ल Ivana Knoll हीनं सांगितलं उपांत्य फेरीत कोण जिंकणार? Video Viral

मेलबर्न स्टार्सच्या (Melbourne Stars) गोलंदाजांनी मॅच ताणून धरली. सामन्यात कमी स्कोर असल्याने तगडी फिल्डिंगची गरज होती. त्याचवेळी ब्रॉडी काऊचच्या दोन अफलातून कॅचने सामन्याचं पारडं फिरलं. सर्वप्रथम त्याने पहिल्याच षटकात मॅथ्यूचा झेल घेतला. शॉर्ट फाईन लेगवर काऊचचा (Brody Couch Superb Catch) सरळ कॅच चुकला, पण त्यानंतर त्याने अंगावर तीन टप्पे घेत कॅच घेतला. त्याचा हा कॅच पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

पाहा Video -

दरम्यान, शेवटच्या षटकात (Last thriller Over) तीन विकेट्स शिल्लक असताना आठ धावांची गरज होती. त्यावेळी काऊचने सिक्स जात असलेला बॉल एका हातात पकडला. त्याच्या या दुसऱ्या सुपरमॅन कॅचची (Brody Couch Catch) देखील तुफान चर्चा रंगलेली दिसत आहे. स्टार्सला शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला आणि विजयी सलामी दिली आहे.