आम्ही विकेट घेण्याचा विचार करत असतानाच भारतीय टीमने धावा केल्या- जेपी डुमिनी

 भारतीय टीमविरुद्ध ३ सामन्यांची सीरीज हरल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या टी20 सिरीजमधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 19, 2018, 09:11 AM IST
आम्ही विकेट घेण्याचा विचार करत असतानाच भारतीय टीमने धावा केल्या- जेपी डुमिनी title=

जोहारनिसबर्ग : भारतीय टीमविरुद्ध ३ सामन्यांची सीरीज हरल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या टी20 सिरीजमधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची टीम चांगलीच नाराज झाली. भारतीय टीमने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये भारतीय टीमने २०३ धावा करत ५ विकेट्स गमावल्या. मात्र दक्षिण आफ्रिकेचा १७५ धावातच धुव्वा उडवला.

पराभवावर डुमिनीची प्रतिक्रिया

यावर डुमिनी म्हणाला की, या पराभवाने मी अत्यंत निराश आहे. आम्ही पहिल्या ६ ओव्हर्समध्ये नेहमी विकेट्स घेण्याचा विचार करत होतो आणि भारतीय टीम बॉल सीमारेषेच्या पलिकडेच पाठवत होते. 

त्याचबरोबर तो म्हणाला की, मी टीमच्या फलंदाजीवर समाधानी नाही आहे. आम्ही धावांची चांगली पार्टनरशिप करु शकलो नाही. मी गोलंदाजीने खूश होतो पण धावांचे लक्ष्य साधण्यात दुर्लक्ष झाले. त्यात आम्ही अयशस्वी ठरलो. नवीन खेळाडूंच्या कामगिरीने मी खूश आहे.

डुमिनी आशावादाने म्हणाला की, आम्हाला कठोर मेहनत घेण्याची गरज आहे. २०४ धावांचे लक्ष्य काबीज करु शकलो असतो. पण आम्ही चांगल्या पद्धतीने नाही खेळलो. नवीन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे आता आम्ही म्हणजे सिनियर खेळाडूंनी जबाबदारी घ्यायला हवी.

विजयाचे श्रेय कोहलीने टीमला दिले

तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विजयाचे श्रेय संपूर्ण टीमला दिले. कोहली म्हणाला की, संपूर्ण टीमने चांगली कामगिरी केली. रोहीत शर्मा आणि शिखर धवनने चांगला खेळ केला. ही आमची सर्वात संतुलित कामगिरी होती.

दक्षिण आफ्रिकेने शेवटी चांगली गोलंदाजी केली. यावर विराट म्हणाला की, अंतिम टप्प्यात  दक्षिण आफ्रिकेने चांगली गोलंदाजी केली. कारण आम्ही १६ ओव्हर्समध्ये २२० धावांचा स्कोर करण्याचा विचार करत होतो. मात्र धोनी आऊट झाल्यानंतर खेळ मंदावला. मात्र स्कोर खेळ जिंकून देण्यासाठी चांगला होता.