Temba Bavuma: आम्हाला आत्मविश्वास होता की...; स्वतःची चूक लपवत टेम्बाने 'या' खेळाडूंना धरलं पराभवासाठी जबाबदार

Temba Bavuma: दक्षिण आफ्रिकेसारख्या ( SA vs NED ) बलाढ्य टीमचा पराभव केला. नेदरलँड्सच्या 245 रन्सच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची ( SA vs NED ) टीम 207 रन्सवर आटोपली. यावेळी नेदरलँड्सने हा सामना 38 रन्सने जिंकला. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 18, 2023, 07:45 AM IST
Temba Bavuma: आम्हाला आत्मविश्वास होता की...; स्वतःची चूक लपवत टेम्बाने 'या' खेळाडूंना धरलं पराभवासाठी जबाबदार title=

Temba Bavuma: मंगळवारी धरमशालाच्या मैदानावर नेदरलँड्सच्या टीमने मोठा इतिहास रचला. नेदरलँड्सच्या ( SA vs NED ) टीमने दक्षिण आफ्रिकेचा 38 रन्सने सामना जिंकला. या सामन्याचा असा निकाल प्रत्येक व्यक्तीसाठी अनपेक्षित होता. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये हा दुसरा मोठा उटलफेर पहायला मिळाला आहे. 

नुकतंच अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवून मोठा उटलफेर केला होता. त्यानंतर आता मंगळवारी तर धरमशालामध्ये नेदरलँड्सने आणखी एक मोठा उलटफेर केला. दक्षिण आफ्रिकेसारख्या ( SA vs NED ) बलाढ्य टीमचा पराभव केला. नेदरलँड्सच्या 245 रन्सच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची ( SA vs NED ) टीम 207 रन्सवर आटोपली. यावेळी नेदरलँड्सने हा सामना 38 रन्सने जिंकला. या दणदणीत पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा ( SA vs NED ) कर्णधार टेम्बा बावुमाने ( Temba Bavuma ) नेदरलँडच्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे. 

नेदरलँड्सने केलेल्या पराभवानंतर काय म्हणाला टेम्बा?

धरमशालामध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा ( Temba Bavuma ) नेदरलँडकडून पराभूत झाल्यानंतर खूपच निराश दिसला. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये त्याने टीमच्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हींमध्ये कुठे नेमकी कमतरता झाली याबाबत माहिती दिली. टेम्बा ( Temba Bavuma ) म्हणाला, आम्ही फलंदाजीपूर्वी गोलंदाजीत फ्लॉप झालो. त्याने आपल्या पराभवासाठी डेथ ओव्हर्समधील गोलंदाजांना पराभवासाठी जबाबदार धरलं.

आम्ही नेदरलँड्सचे ( SA vs NED ) 5 विकेट्स लवकर घेतले. त्यामुळे आम्ही त्यांना कमी धावसंख्येवर बाद करायला हवं होतं. मात्र यावेळी आम्ही हे करू शकलो नाही. मला वाटतं की, आम्ही त्यांना 6 बाद 112 धावांवर रोखलं. त्यांना 200 रन्सच्या पुढे जायला देणं महागात पडलं. असं असतानाही तरीही लक्ष्याचा पाठलाग करण्याचा आम्हाला आत्मविश्वास होता. पण आमच्या नेदरलँड्सची टीम फलंदाजीतील काही उणिवा शोधण्यात यशस्वी ठरली.

टीमबद्दल बोलताना टेम्बा बावुमा ( Temba Bavuma ) म्हणाला, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात सामना जिंकण्याबद्दल आम्हाला खात्री होती. आम्ही अतिरिक्त गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकलो असतो. आम्ही फिल्डींगमध्ये चांगली कामगिरी केली नाही. टीमधील खेळाडूंशी बोलणं आवश्यक आहे. नेदरलँड्सने चांगली कामगिरी केली असून त्याचं खूप अभिनंदन”

कर्णधाराची निराशाजनक कामगिरी

2023 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला चांगली आणि मोठी खेळी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 5 बॉल्समध्ये 8 रन्स केले. दुसऱ्या सामन्यात बावुमानेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध निराशाजनक कामगिरी केली. यावेळी त्याने 55 बॉल्समध्ये 35 रन्सची खेळी खेळली. तर नेदरलँड्सविरूद्ध त्याला केवळ 16 रन्स करता आले.