IND vs SL 2nd ODI : बाऊंड्रीजवळ Suryakumar Yadav आणि सिराजमध्ये काय खुसुरपुसुर सुरु होतं? VIDEO होतोय व्हायरल

दुसऱ्या वनडे सामन्यातही टीम इंडियामध्ये स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला नाहीये. मात्र प्लेईंग 11 मध्ये नसूनही टीम इंडियापासून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दूर राहू शकलेला नाही.  

Updated: Jan 12, 2023, 05:01 PM IST
IND vs SL 2nd ODI : बाऊंड्रीजवळ Suryakumar Yadav आणि सिराजमध्ये काय खुसुरपुसुर सुरु होतं? VIDEO होतोय व्हायरल title=

IND vs SL 2nd ODI : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर (Eden Gardens Kolkata) आज भारत विरूद्ध श्रीलंका (Ind Vs SL) यांच्यामध्ये सामना रंगला आहे. दुसऱ्या वनडे  सामन्यात देखील श्रीलंकेने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान दुसऱ्या वनडे सामन्यातही टीम इंडियामध्ये स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) समावेश करण्यात आला नाहीये. मात्र प्लेईंग 11 मध्ये नसूनही टीम इंडियापासून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दूर राहू शकलेला नाही.  

दुसऱ्या वनडे सामन्यात आराम करण्याव्यतिरीक्त सूर्या बाऊंड्री लाईनजवळ येऊन इतर खेळाडूंशी बोलताना कॅमेरात कैद झाला आहे. इतर खेळाडूंनी गुरुमंत्र देतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Suryakumar Yadav बाऊंड्री जवळ येऊन मोहम्मद सिराजला दिल्या टीप्स

कोलकात्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान श्रीलंका फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) बाऊंड्री लाईनवर उभा होता. यावेळी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) बाऊंड्रीजवळ येऊन सिराजला गुरूमंत्र देत होता. 

श्रीलंकेच्या 7 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमी बाऊंड्री लाईनजवळ उभा होता. त्यापूर्वीच्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने टीम इंडियाला विकेट मिळवून दिली. सिराजने फलंदाज अविष्का फर्नेन्डोला पव्हेलियनचा रस्ता दाखवलाय. यानंतर मोहम्मद सिराज आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) एकमेकांसोबत खुसपुस करताना दिसले.

दरम्यान या दोघांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अंदाजावरून असं कळतंय की, सुर्यकुमार सिराजला विकेट मिळाल्यानंतर त्याचं कौतुक करत होता. 

सूर्यकुमारला आजही संधी नाही

सूर्याच्या चाहत्यांना त्याला वनडे खेळताना पाहायचं आहे. मात्र आजच्या सामन्यातंही त्याला संधी दिली गेली नाही. त्यामुळे सूर्याच्या चाहत्यांचा आज हिरमोड झाला आहे.