जेव्हा धोनीने बस चालवत संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये पोहोचवलं

धोनीला पाहून सगळेच झाले हैराण

Updated: Nov 20, 2018, 02:35 PM IST
जेव्हा धोनीने बस चालवत संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये पोहोचवलं title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कमेंटेटर वंगिपुरप्पु वेंकटा साई (वीवीएस) लक्ष्मणने '281 and Beyond'ही आत्मकथा लिहिली आहे. ही आत्मकथेचं प्रकाशन 19  नोव्हेंबरला झालं. या पुस्तकामध्ये लक्ष्मणने त्याच्या करिअर दरम्यानचे काही किस्से सांगितले आहेत. ज्यामध्ये नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टेस्ट टीमचा कर्णधार असलेल्या धोनीने कशा प्रकारे बस चालवत संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये आणलं.

नागपूरमध्ये 100 वी टेस्ट सामना खेळत असताना धोनीला बस चालवतांना पाहून लक्ष्मण हैराण झाला होता. लक्ष्‍मणने या पुस्तकात म्हटलं आहे की, 'नागपूरमध्ये टीमची बस घेऊन धोनी हॉटेलला घेऊऩ आला तो क्षण मला आजही आठवतो. मला माझ्या डोळ्यांवर देखील विश्वास होत नव्हता. टीम इंडियाचा कर्णधार धोनी हा स्वत: बस चालवत आम्हाला मैदानातून हॉटेलला घेऊन आला. अनिल कुंबळेच्या रिटायरमेंटनंतर कर्णधार म्हणून हा धोनीचा पहिला सामना होता. त्याला जगाची चिंता नव्हती. पण तो असाच होता. चंचल पण जमिनीची जोडलेला.'

एका वृत्तपत्रात पुस्तकाचा काही भाग प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार इंग्‍लंडमध्ये 4-0 ने सीरीज गमावल्यानंतर धोनीच्या वागण्यात कोणताच बदल नव्हता. 2011 मध्ये इंग्लंड दौऱ्यात पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही 3 सामने गमावले. माझ्य़ा सारखे अनेक खेळाडू हताश दिसत होते. पण धोनीचा शांतपणा आश्चर्यजनक होता. 

एकवेळाही धोनीच चिडला नाही. त्याने हे देखील दाखवलं नाही की तो दु:खी नाही. माझं डोकं ठिकाण्य़ावर होतं. पण धोनीची लेवल काही तरी वेगळीच होती. त्याने मला म्हटलं लक्षी भाई, दु:खी आणि उदास राहून काय फायदा. याचा परिणाम तुमच्या कामगिरीवर होईल आणि आणखी नुकसान होईल.'