RCB vs LSG: विराटची विकेट घेणारा कोण आहे M Siddharth? 2 महिन्यांपूर्वी एका रात्रीत झालेला फेमस

IPL 2024 RCB vs LSG: आयपीएलच्या 17 व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सने कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान विराट कोहलीची विकेट घेणारा एम. सिद्धार्थ आहे तरी कोण? अशी चर्चा सुरु आहे.  

श्वेता चव्हाण | Updated: Apr 3, 2024, 10:01 AM IST
RCB vs LSG: विराटची विकेट घेणारा कोण आहे M Siddharth? 2 महिन्यांपूर्वी एका रात्रीत झालेला फेमस title=

M Siddharth got Virat Kohli Wicket in Marathi : आयपीएलच्या 17  व्या हंगामात काल (2 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान लखनऊचा या हंगामातील दुसरा विजय आहे. लखनऊच्या युवा गोलंदाजांनी आरसीबीला नमवले असून वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि फिरकीपटू माणिमारन सिद्धार्थ यांचा समावेश आहे. या सामन्यानंतर चर्चा सुरु आहे ती म्हणजे माणिमारन सिद्धार्थ आहे तरी कोण?  

लखनऊने पहिल्या सामन्यात बंगळुरूने 182 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तरात आरसीबी केवळ 153 धावा केला. दरम्यान या मोसमात आरसीबीचा घरच्या मैदानावरील हा तिसरा पराभव आहे. तर लखनऊचा या हंगामातील हा दुसरा विजय आहे. लखनऊ सुपर जायंट्समधील मणिमारन सिद्धार्थ याने आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर पहिली विकेट घेतली ती पण विराट कोहलची. 

माणिमारन सिद्धार्थ आहे तरी कोण?  

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुलनं विराट कोहलीला जाळ्यात अडकवण्यासाठी खेळलेला डाव यशस्वी ठरला आहे. मणिमारन सिद्धार्थ याने मिळालेल्या संधीच सोनं करत आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या रुपात आयपीएलमध्ये विकेटचे खाते उघडले. विराटच्या विकेटनंतर सर्वत्र एकच सुरु आहे ती म्हणजे एम सिद्धार्थ आहे तरी कोण? 

तामिळनाडूचा ऑफस्पिनर 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. पण दुखापतीमुळे त्याचा आयपीएलचा प्रवास थांबला होता. मात्र त्यानंतर त्याने त्याच्या राज्यासाठी आणि तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे सिद्धार्थने आयपीएलमध्ये पुन्हा पुनरागमन केले. मणिमरन सिद्धार्थने डावखुरा असुन ऑफस्पिन गोलंदाजी केली.  

मणिमारनला लखनऊला 2024 लीलावतमध्ये 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याच्या T20 पदार्पणात मणिमारन सिद्धार्थने 7 डाव खेळताना 6.5 च्या अविश्वसनीय गोलंदाजीच्या सरासरीने 18 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत खेळलेल्या 17 सामन्यांमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्येच तामिळनाडूला खेळण्याची परवानगी मिळाली असती. प्रथम श्रेणी पदार्पणात त्याने आतापर्यंत 7 सामन्यात 27 बळी घेतले आहेत. तसेच सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत तामिळनाडू संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. सिद्धार्थ या विजयाचा हिरो ठरला. त्याने विजेतेपदाच्या लढाईत 4 विकेट घेतल्या, त्यानंतर त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर आता आयपीएलमध्ये विराट कोहलीची विकेट घेत खाते उघडणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता मणिमरन सिद्धार्थचा समावेश झाला आहे.