Vivo बाजुला झाल्यानंतर यंदा कोण असेल आयपीएलचे शीर्षक प्रायोजक?

IPL च्या टायटल स्पॉन्सरसाठी या कंपन्या चर्चेत... 

Updated: Aug 8, 2020, 10:16 AM IST
Vivo बाजुला झाल्यानंतर यंदा कोण असेल आयपीएलचे शीर्षक प्रायोजक? title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएल 2020 साठी पूर्णपणे सज्ज आहे. यावेळी, बीसीसीआयने आयपीएल सीझन 13 च्या शीर्षक प्रायोजक म्हणून चिनी मोबाईल कंपनी विवोला दूर केले आहे. खरंतर, अलीकडेच भारत सरकारने भारत-चीन वादावरून 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. विवो बर्‍याच वर्षांपासून आयपीएलचा प्रायोजक आहे. पण भारतात विवो या चिनी कंपनीला विरोध होत होता.

बीसीसीआय बोर्डाच्या बैठकीत विवोला आयपीएल शीर्षक प्रायोजकातून हटवल्यानंतर आता कोणती कंपनी आयपीएलची प्रायोजक असेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. या शर्यतीत बऱ्याच कंपन्या आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, बीसीसीआयने विवोला आयपीएल शीर्षक प्रायोजक म्हणून काढून टाकण्याची अधिकृतता कळताच अनेक कंपन्यांनी आणि स्वत: बीसीसीआयने नवीन शीर्षक प्रायोजक शोधण्यास सुरवात केली. विवोला शीर्षक प्रायोजक म्हणून काढून टाकल्यानंतर बीसीसीआयला मोठा तोटा झाला असला तरी भारतीय क्रिकेट बोर्डाने इतर शीर्षक प्रायोजक कंपनी सोबत १८० कोटी रुपयांच्या करारावर सहमती दर्शविली आहे. असेही बोलले जात आहे की पुढच्या वर्षी विवो आयपीएलचा शीर्षक प्रायोजक म्हणून परत येऊ शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएलच्या नवीन शीर्षक प्रायोजकांची यादी बरीच लांब आहे, ज्यामध्ये टीम इंडियाची जर्सी प्रायोजक कंपनी बयजूस (BYJU'S), माय सर्कल 11 (MYCIRCLE11), अ‍ॅमेझॉन (AMAZON), ड्रीम इलेव्हन (DREAM11) आणि अनअकॅडेमी (UNACADEMY) यांचा यमावेश आहे. बैजूस आणि ड्रीम इलेव्हन हे आयपीएल शीर्षक प्रायोजक शर्यतीत आघाडीवर मानले जात आहेत, कारण या दोन्ही कंपन्या आधीच बीसीसीआयशी संबंधित आहेत. एकीकडे टीम इंडियाची जर्सी प्रायोजकत्व म्हणून बयजूसने मंडळाला 1079 कोटी रुपयांची भरपाई दिली. तर दुसरीकडे, ड्रीम इलेव्हन इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची दुसरी अधिकृत भागीदार आहे, जो प्रत्येक हंगामात 40 कोटींची रक्कम भरतो आणि बीसीसीआयशी करार करतो.