SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.

सौरभ तळेकर | Updated: May 16, 2024, 08:42 PM IST
SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी? title=
SRH vs GT, CSK or RCB, rain

IPL 2024, SRH vs GT : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू होण्याआधी पाऊस सध्या जोरदार बॅटिंग करत असल्याचं पहायला मिळतंय. सततच्या पावसामुळे आता सामना रद्द होणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. आजचा सामना (Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans) पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबादसाठी महत्त्वाचा आहे. प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर सामना हैदराबादला जिंकावाच लागेल. जर सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल अन् हैदराबाद थेट प्लेऑफसाठी क्वालिफाय करेल. मात्र, पावसामुळे जर सामना रद्द झाला तर महत्त्वाच्या अशा चेन्नई विरुद्ध आरसीबी यांच्या सामन्यावर काय परिणाम होईल? आणि फायदा कोणाला होईल? याचं समीकरण जाणून घ्या.

फायदा कोणाला? चेन्नई की आरसीबी?

पावसामुळे सामना रद्द झाला तर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची चिंता वाढेल. कारण, सनरायझर्सच्या पराभवाचा फायदा दोन्ही संघांना (CSK or RCB) मिळेल. आरसीबी अधिक चिंतेत असेल कारण 13 सामन्यांनंतर त्याचे केवळ 12 गुण आहेत. जर आरसीबीला प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल तर 18 मे रोजी होणाऱ्या सामन्यात सीएसकेला पराभूत करावे लागेल. जर आजच्या सामन्यात हैदराबाद पराभूत झाली तर चेन्नई आणि आरसीबी या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळेल.

प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी चेन्नईला ही हा सामना जिंकावा लागेल. सीएसके आणि आरसीबी या दोघांनाही सनरायझर्सने आजचा दोन्ही सामने गमावावा, अशी अपेक्षा करावी लागेल. असं झाल्यास आणि पुढील सामना आरसीबीने जिंकल्यास दोन्ही संघ चेन्नई आणि आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात.

गुजरात टायटन्सची टीम : शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथर.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.