स्वत: च्याच गोल्डन DUCK वर का हसला विराट कोहली?

विराट कोहली स्वत: च्याच गोल्डन DUCK वर का हसला? पाहा व्हिडीओ 

Updated: May 11, 2022, 04:10 PM IST
स्वत: च्याच गोल्डन DUCK वर का हसला विराट कोहली? title=

मुंबई : विराट कोहलीचा टीम इंडियापाठोपाठ आयपीएलच्या पंधराव्या हंगामातही वाईट फॉर्म पाहायला मिळाला. कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतरही त्याच्या बॅटिंगमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही. यंदाच्या हंगामात तो दोन वेळा गोल्डन डक झाला. 

एकवेळा रॉयल डकचा कोहली शिकार झाला. कोहलीला गोल्डन डक लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मिळाला होता. दुसऱ्यावेळी हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तो आऊट झाला होता. त्यानंतर कोहलीला खूप ट्रोलही करण्यात आलं होतं. 

कोहलीला प्राणी-पक्षी आवडतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो पाळण्यासाठी वेळ नाही असं म्हणाला तेव्हा प्रश्न विचारणाऱ्याने त्याला डक आवडतात ना असंही म्हटलं. त्यावर कोहलीला हसू आवरलं नाही. 

या सगळ्यात मला असहय्य झाल्यासारखं वाटलं अशी भावना विराट कोहलीने व्यक्त केली आहे. कोहलीला हे सांगतानाही हसू आवरलं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आयपीएल 2022 मध्ये कोहली फक्त एकाच डावात अर्धशतक झळकवण्यात यशस्वी ठरला. नाहीतर पूर्ण हंगामात त्याला फार काही चांगलं खेळता आलं नाही. 12 सामन्यात 216 धावा करण्यात त्याला यश मिळालं आहे.